ICC Ranking मध्ये दिनेश कार्तिकची झेप, टॉप-10 ईशान एकमेव भारतीय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

icc ranking latest update dinesh karthik huge jump ishan kishan

ICC Ranking मध्ये दिनेश कार्तिकची झेप, टॉप-10 ईशान एकमेव भारतीय

ICC Ranking: आयसीसीने बुधवारी टी-20 फलंदाज आणि गोलंदाजांची क्रमवारी जाहीर केली. टी-20 संघाच्या क्रमवारीत भारत अजूनही अव्वल आहे, तर दक्षिण आफ्रिका चौथ्या स्थानावर आहे. एकदिवसीय क्रमवारीत, श्रीलंकेविरुद्ध मालिका गमावल्यामुळे ऑस्ट्रेलियाचे 6 गुण कमी झाले आणि ते पाचव्या स्थानावर घसरले आहे, तर श्रीलंका अजूनही आठव्या स्थानावर आहे.

आयसीसीने बुधवारी टी-20 फलंदाज आणि गोलंदाजांची क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत भारतीय संघाचा युवा सलामीवीर ईशान किशनने आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात नुकत्याच पार पडलेल्या टी-२० मालिकेत ईशान किशनने चांगली कामगिरी केली होती. या मालिकेत त्याने दोन अर्धशतकांसह 41.20 च्या सरासरीने 206 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर संघाचा यष्टिरक्षक आणि वरिष्ठ खेळाडू दिनेश कार्तिकलाही त्याच्या उत्कृष्ट कामगिरीने झेप घेतले आहे. खरे तर कार्तिक या यादीत १०८ स्थानांची झेप 87व्या स्थानावर पोहोचले आहे. त्याचबरोबर फलंदाजांच्या क्रमवारीत पाकिस्तानचा बाबर आझम अव्वल तर त्याचाच देशबांधव मोहम्मद रिझवान दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे.

Web Title: Icc Ranking Latest Update Dinesh Karthik Huge Jump Ishan Kishan 6th Cricket News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top