ICC Rankings : चालू सामन्यात मोहम्मद सिराजकडून हिसकावले सिंहासन! 'या' खेळाडूने पटकावला अव्वल क्रमांक

ICC Rankings : चालू सामन्यात मोहम्मद सिराजकडून हिसकावले सिंहासन! 'या' खेळाडूने पटकावला अव्वल क्रमांक

ICC Rankings : भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला ICC पुरुषांच्या एकदिवसीय गोलंदाजी क्रमवारीत मोठा फटका बसला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेडने त्याला चांगला धुतला. त्यानंतर त्याने आपले नंबर-1 स्थान गमावले. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड आता नंबर-1 वनडे गोलंदाज बनला आहे, तर सिराज तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. हेजलवुडनंतर ट्रेंट बोल्ट दुसऱ्या क्रमांकावर आहे.

ICC Rankings : चालू सामन्यात मोहम्मद सिराजकडून हिसकावले सिंहासन! 'या' खेळाडूने पटकावला अव्वल क्रमांक
Team India WC23 : कोच राहुल द्रविडचा मोठा खुलासा! वर्ल्ड कप साठी भारतीय संघ निश्चित; सूर्या...

मिचेल स्टार्क चौथ्या क्रमांकावर तर राशिद खान पाचव्या क्रमांकावर कायम आहे. टॉप-10 वनडे गोलंदाजांमध्ये इतर कोणत्याही भारतीयाचा समावेश नाही. आयसीसी पुरुषांच्या एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत बाबर आझम पहिल्या क्रमांकावर कायम आहे. भारताकडून शुभमन गिल पाचव्या, तर विराट कोहली आठव्या क्रमांकावर आहे. रोहित शर्मा एका स्थानाच्या फायदासह 9व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

ICC Rankings : चालू सामन्यात मोहम्मद सिराजकडून हिसकावले सिंहासन! 'या' खेळाडूने पटकावला अव्वल क्रमांक
IND vs AUS 3rd ODI: चेन्नईत हरलो तर… केवळ मालिकाच नाही तर सत्ताही धोक्यात!

कसोटी फलंदाजी क्रमवारीत मार्नस लॅबुशेन पहिल्या स्थानावर कायम आहे. केन विल्यमसनने कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत चार स्थानांची झेप घेत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. स्टीव्ह स्मिथ तिसऱ्या, जो रूट चौथ्या तर बाबर आझम पाचव्या स्थानावर घसरला आहे. भारताच्या ऋषभ पंतचा टॉप-10 कसोटी फलंदाजांमध्ये समावेश आहे. पंत 9व्या स्थानावर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com