Annual ICC Rankings: T20 चा बादशाह पुन्हा एकदा टीम इंडियाच ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

icc t20 ranking team india no1

Annual ICC Rankings: T20 चा बादशाह पुन्हा एकदा टीम इंडियाच !

Annual ICC Rankings:आयसीसीने टी-20 संघाची क्रमवारी जाहीर केली आहे. त्यात भारतीय संघाने आपला दबदबा कायम ठेवला आहे. टी-20 विश्वविजेता ऑस्ट्रेलिया वार्षिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर आहे. भारत ताज्या क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असून, इंग्लंडपेक्षा पाच रेटिंग जास्त आहे. इंग्लंड 265 रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे. संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे झालेल्या आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 मध्ये भारताची कामगिरी निराशाजनक होती. भारतीय संघाला उपांत्य फेरीपर्यंत मजल मारता आली नाही. पण त्यानंतर संघाने T20 फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली.(ICC T-20 Ranking Team India No1)

वार्षिक क्रमवारीनुसार एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंड जगातील नंबर वन संघ आहे. 2021 मध्ये सुरू झालेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेचा पाचवा आणि अंतिम सामना खेळल्यानंतर या क्रमवारीत समावेश केला जाईल. आयसीसी पुरुषांच्या कसोटी संघ क्रमवारीच्या वार्षिक अपडेट नंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या स्थानावर असलेल्या भारतावरील आघाडी एका गुणावरून नऊ गुणांपर्यंत वाढवली आहे, तर पाकिस्तानचा संघ पाचव्या स्थानावर असलेल्या इंग्लंडच्या जागी आहे. असे आयसीसीने पत्रकात म्हटले आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने घरच्या मैदानावर न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेचा पराभव केला. इंग्लंड 265 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. 261 रेटिंग गुणांसह पाकिस्तान पहिल्या तीनमध्ये पोहोचला आहे. चौथ्या स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेने आपला जुना रेटिंग पॉइंट (253) कायम आहे.