टी -20 विश्वचषकासाठी ICC घेणार रिव्ह्यू; स्पर्धेचे वेळापत्रक कोलमडणार की...

ICC, World Cup
ICC, World Cup

कॅनबेरा : कोरोना विषाणूच्या संसर्गामूळे सगळ्याच देशात सध्या भीतीचे वातावरण आहे. चीनच्या वुहान शहरातून उत्पत्त झालेल्या या विषाणूचा संसर्ग संपूर्ण जगभर झाला असून याचा फटका क्रीडा क्षेत्रालाही मोठ्या प्रमाणावर बसलेला आहे. जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक बदलावे लागल्या असून काही स्पर्धा रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे. खेळ जगतातील नयनरम्य पहाट म्हणून समजली जाणारी यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा देखील पुढील वर्षी ढकलण्यात आलेली आहे. कोरोनाचा परिणाम आता क्रिकेट जगतावर देखील दिसून येत असून  टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धांचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  

सद्याच्या स्थितीमध्ये जगभरातील सर्वच देशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता ऑस्ट्रेलिया येथे १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान रंगणाऱ्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करणे कठीण असल्याचे मत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) म्हटले आहे. याबद्दलची अधिकृत घोषणा लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून होण्याची शक्यता आहे. टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धांचे यंदाचे सातवे पर्व नियोजित वेळापत्रकानुसार ऑस्ट्रेलिया येथे खेळवले जाणार होते. मात्र कोरोना विषाणूच्या संसर्गामूळे सगळ्याच क्रिकेट स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्याची नामुष्की ओढवली. तसेच अजूनतरी कोरोनाच्या या संकटावर नियंत्रण मिळवण्यात यश आलेले नाही, त्यामुळेच टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट व्यवस्थापन मंडळ यांची बैठक होणार असून त्यानंतर टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या भविष्याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.      

विदेशी टी-20 खेळण्यासाठी परवानगी द्या, रॉबिन उथप्पाची बीसीसीआयकडे मागणी  
           
कोरोनामुळे क्रीडा क्षेत्राची वाताहत झाल्याचे दिसत असताना दुसरीकडे दक्षिण कोरियात मात्र फुटबॉल लीगचे सामने सुरु करण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. लीगचे हे सामने प्रेक्षकांशिवाय घेण्यात येणार असून कोरोनाच्या खबरदारीचा विचार करून नियम देखील बदलण्यात आले आहेत. त्यामुळे जगभरात तब्बल दोन महिन्याच्या कालावधी नंतर फुटबॉलचा सामना रंगणार आहे. दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे थांबवण्यात आलेल्या फुटबॉलच्या स्पर्धा पुन्हा चालू करण्याच्या दिशेने युरोपात विचार होऊ लागला आहे. स्पर्धेचे आयोजन होत नसल्या कारणाने होणारे नुकसान भरून काढण्यासाठी प्रेक्षकांशिवाय स्पर्धांचे आयोजन करावे, जेणेकरून दूरचित्रवाणीवर प्रसारण करून थोड्या प्रमाणात तरी होणारे आर्थिक नुकसान भरून काढता येईल असे काही क्रीडा संघटनांचे म्हणणे आहे. जर्मनीतील फुटबॉल संघटना देखील बुंदेसलिगाच्या लीग सामन्यांना सुरवात करण्याच्या विचारात असल्याचे समजते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com