T20 World Cup 2020 : ट्वेंटी20 वर्ल्डकपमध्ये भारत-पाक नाही लढणार! वेळापत्रक जाहीर

वृत्तसंस्था
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

आयसीसीने पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेंटी20 विश्वकरंडकाचे पूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. पाच आठवडे चालणारी ही स्पर्धा 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2020 या कालावधीत पार पडेल.

दुबई : आयसीसीने पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेंटी20 विश्वकरंडकाचे पूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. पाच आठवडे चालणारी ही स्पर्धा 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2020 या कालावधीत पार पडेल.

विराट-अनुष्का बर्थडे सेलिब्रेशनसाठी 'या' निसर्गरम्य ठिकाणी

गत चॅम्पियन श्रीलंका आणि बांगलादेश यांची क्रमवारी कमी असल्याकारणाने पुरुष ट्वेंटी20 विश्वचषक सुपर 12 साठी थेट पात्र ठरण्यात अयशस्वी ठरले आहेत. त्यांना आता 2020 मध्ये होणाऱ्या या मालिकेत जागा मिळवण्यासाठी साखळी टप्प्यातील स्पर्धेत सहभाग घ्यावा लागेल.

आयर्लंड, नामिबिया, नेदरलॅंड्स, ओमान, पापुआ न्यू चिन्हुआ आणि स्कॉटलंड यांनी साखळी स्पर्धेत आपले स्थान पक्के केले आहे. श्रीलंका, पापुआ न्यू चिन्हुआ, ओमान आणि आयर्लंड हे संघ अ गटात असतील तर नेदरलॅंड्स, नामिबिया, स्कॉटलंड आणि बांगलादेश हे ब गटात असतील. 

साखळी स्पर्धेनंतर अ गटातील पहिला संघ आणि ब गटातील दुसरा संघ सुपर 12मध्ये पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजसोबत सहभागी होईल. दुसरीकडे अ गटातील दुसरा संघ आणि ब गटातील पहिला संघ सुपर 12मध्ये भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगणिस्तानसोबत सहभागी होईल.

INDvsBAN : आम्ही विसरलोच मुशफिकूर बुटका आहे : रोहित शर्मा

यजमान ऑस्ट्रेलिया पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळेल तर भारत 24 ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना खेळेल. 

आयसीसी  ट्वेंटी20 विश्वकरंडक 2020चे वेळापत्रक

पहिला राऊंड
ऑक्टोबर 18- श्रीलंका विरुद्ध क्वॉलिफायर A3, साऊथ गिलॉंग
ऑक्टोबर 18- क्वॉलिफायर A2 विरुद्ध क्वॉलिफायर A4, साऊथ गिलॉंग
ऑक्टोबर 19- बांगलादेश विरुद्ध क्वॉलिफायर B3, तस्मानिया
ऑक्टोबर 19- क्वॉलिफायर B2  विरुद्ध क्वॉलिफायर B4, तस्मानिया
ऑक्टोबर 20- क्वॉलिफायर A3  विरुद्ध क्वॉलिफायर A4, साऊथ गिलॉंग
ऑक्टोबर 20- श्रीलंका विरुद्ध क्वॉलिफायर A2, साऊथ गिलॉंग
ऑक्टोबर 21- क्वॉलिफायर B3 विरुद्ध क्वॉलिफायर B4, तस्मानिया
ऑक्टोबर 21- बांगलादेश विरुद्ध क्वॉलिफायर B2, तस्मानिया
ऑक्टोबर 22- क्वॉलिफायर A2 विरुद्ध क्वॉलिफायर A3, साऊथ गिलॉंग
ऑक्टोबर 22- श्रीलंका विरुद्ध क्वॉलिफायर A4, साऊथ गिलॉंग
ऑक्टोबर 23- क्वॉलिफायर B2  विरुद्ध क्वॉलिफायर B3, तस्मानिया
ऑक्टोबर 23- बांगलादेश विरुद्ध क्वॉलिफायर B4, तस्मानिया

सुपर 12
ऑक्टोबर 24- ऑस्ट्रेलिया vs पाकिस्तान (सिडनी क्रिकेट ग्राऊंड)
ऑक्टोबर 24- भारत vs दक्षिण आफ्रिका (पर्थ स्टेडिअम)
ऑक्टोबर 25- न्यूझीलंड vs वेस्टइंडिज (मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड)
ऑक्टोबर 25- क्वालिफायर १ vs क्वालिफायर २ (बेलेरिव्ह ओव्हल)
ऑक्टोबर 26- अफगाणिस्तान vs क्वालिफायर ए २ (पर्थ स्टेडिअम)
ऑक्टोबर 27- इंग्लंड vs क्वालिफायर बी १ (पर्थ स्टेडिअम)
ऑक्टोबर 27- न्यूझीलंड vs क्वालिफायर बी २ (बेलेरिव्ह ओव्हल)
ऑक्टोबर 28- अफगाणिस्तान vs क्वालिफायर बी १ (पर्थ स्टेडिअम)
ऑक्टोबर 28- ऑस्ट्रेलिया vs वेस्टइंडीज (पर्थ स्टेडियम)
ऑक्टोबर 29- भारत vs क्वालिफायर ए १ (मेलबर्न क्रिकेट ग्राउंड)
ऑक्टोबर 29- पाकिस्तान vs क्वालिफायर ए १ (सिडनी क्रिकेट ग्राउंड)
ऑक्टोबर 30- इंग्लंड vs दक्षिण अफ्रिका (सिडनी क्रिकेट ग्राउंड)
ऑक्टोबर 30- वेस्टइंडीज vs क्वालिफायर बी १ (पर्थ स्टेडियम)
ऑक्टोबर 31- पाकिस्तान vs न्यूझीलंड (गाबा)
ऑक्टोबर 31- ऑस्ट्रेलिया vs क्वालिफायर ए १ (गाबा)
नोव्हेंबर 1-   भारत vs इंग्लंड (मेलबर्न क्रिकेट ग्राउंड)
नोव्हेंबर 1-   दक्षिण अफ्रिका vs अफगानिस्तान (एडिलेड ओवल)
नोव्हेंबर 2-   क्वालिफायर ए १ vs क्वालिफायर बी 1 (सिडनी क्रिकेट ग्राउंड)
नोव्हेंबर 2-   न्यूझीलंड vs क्वालिफायर ए १ (गाबा)
नोव्हेंबर 3-   पाकिस्तान vs वेस्टइंडीज (एडिलेड ओव्हल)
नोव्हेंबर 3-   ऑस्ट्रेलिया vs क्वालिफायर बी २ (एडिलेड ओव्हल)
नोव्हेंबर 4-   इंग्लंड vs अफगाणिस्तान (गाबा)
नोव्हेंबर 5-   दक्षिण अफ्रिका vs क्वालिफायर ए २ (एडिलेड ओव्हल)
नोव्हेंबर 5-   भारत vs क्वालिफायर बी १ (एडिलेड ओव्हल)
नोव्हेंबर 6-   पाकिस्तान vs क्वालिफायर बी २ (मेलबर्न क्रिकेट ग्राउंड)
नोव्हेंबर 6-   ऑस्ट्रेलिया vs न्यूझीलंड (मेलबर्न क्रिकेट ग्राउंड)
नोव्हेंबर 7-   वेस्टइंडीज vs क्वालिफायर ए १ (मेलबर्न क्रिकेट ग्राउंड)
नोव्हेंबर 7-   इंग्लंड vs क्वालिफायर ए २ (एडिलेड ओवल)
नोव्हेंबर 8-   दक्षिण अफ्रिका vs क्वालिफायर बी १ (सिडनी क्रिकेट ग्राउंड)
नोव्हेंबर 8-   भारत vs अफगाणिस्तान (सिडनी क्रिकेट ग्राउंड)
सेमीफायनल
नोव्हेंबर 11 – पहिली सेमीफायनल (सिडनी क्रिकेट ग्राउंड)
नोव्हेंबर 12 – दुसरी सेमीफायनल (एडिलेड ओव्हल)
फायनल
नोव्हेंबर 15 – फायनल (मेलबर्न क्रिकेट ग्राउंड)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ICC T20 World Cup 2020 Full Schedule Announced