T20 World Cup : श्रीलंकेचे आव्हान कायम, अमिरातीचा उडवला धुव्वा

सलामीच्या लढतीत नामिबियाकडून पराभवाचा धक्का सहन करणाऱ्या श्रीलंकने अमिरातीचा ७९ धावांनी धुव्वा उडवत झोकात पुनरागमन केले.
T20 World Cup
T20 World CupSAKAL

T20 World Cup 2022 : सलामीच्या लढतीत नामिबियाकडून पराभवाचा धक्का सहन करणाऱ्या श्रीलंकन क्रिकेट संघाने मंगळवारी टी-२० विश्‍वकरंडकात अमिरातीचा ७९ धावांनी धुव्वा उडवत झोकात पुनरागमन केले. त्यामुळे आशियाई विजेत्या श्रीलंकेचे या स्पर्धेच्या पुढल्या फेरीत पोहोचण्याचे आव्हानही कायम राहिले. श्रीलंकेने पहिल्या फेरीतील अ गटाच्या लढतीत विजय मिळवत २ गुणांची कमाई केली असून अमिरातीला अद्याप गुणांचे खाते उघडता आलेले नाही.

T20 World Cup
SL vs UAE | VIDEO : कार्तिक मयप्पन चेन्नईतून पोहचला युएईत! केली लंकेविरूद्ध ऐतिहासिक 'हॅट्ट्रिक'

श्रीलंकेकडून मिळालेल्या १५३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या अमिरातीचा डाव १७.१ षटकांमध्ये ७३ धावांमध्येच संपुष्टात आला. माहीश थिकशाना व वनिंदू हसरंगा या फिरकी गोलंदाजांच्या आणि दुशमंता चमीरा या वेगवान गोलंदाजाच्या प्रभावी माऱ्यासमोर अमिरातीच्या फलंदाजाची डाळ शिजली नाही. चिराग सुरीने १४ धावांची, अयान खानने १९ धावांची आणि जुनेद सिद्धीकीने १८ धावांची खेळी केली.

नेदरलँडचा सलग दुसरा विजय

नेदरलँडने मंगळवारी टी-२० विश्‍वकरंडकातील सलग दुसरा विजय नोंदवला. पहिल्या लढतीत अमिरातीला पराभूत करणाऱ्या नेदरलँडने मंगळवारी नामिबियाला ५ विकेट राखून पराभूत केले. या विजयामुळे मुख्य फेरीत पोहोचण्याच्या नेदरलँडच्या आशा उंचावल्या आहेत.

T20 World Cup
Matthew Wade : हो धक्का मारला! ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाचा खळबळजनक खुलासा

अ गटातील स्थिती

  • १) नेदरलँड - ४ गुण

  • २) नामिबिया - २ गुण

  • ३) श्रीलंका - २ गुण

  • ४) अमिराती - ०

T20 World Cup
Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरने सांगितले सूर्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे रहस्य

निस्सांकाचे दमदार अर्धशतक

अमिराती संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पाथुम निस्सांका व कुशल मेंडिस या सलामी जोडीने ४२ धावांची आश्‍वासक भागीदारी केली. आर्यन लाक्राने मेंडिसला १८ धावांवर बाद करीत जोडी तोडली. त्यानंतर धनंजया डिसिल्व्हाने ३३ धावांची खेळी केली; पण तो धावचीत बाद झाला. निस्सांकाने एका बाजूने श्रीलंकेसाठी मोलाची कामगिरी बजावली. त्याने ६० चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ७४ धावांची खेळी साकारली. निस्सांकाचीच सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. श्रीलंकेने २० षटकांत ८ बाद १५२ धावा फटकावल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com