Yuvraj Singh: युवीने ENG चॅम्पियन झाल्यावर केलं अनोखं विधान! 'ससुराल वालों...' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

icc t20 world cup 2022 title england win defeat pakistan yuvraj singh

Yuvraj Singh: युवीने ENG चॅम्पियन झाल्यावर केलं अनोखं विधान! 'ससुराल वालों...'

T20 World Cup 2022 : जगभरातील क्रिकेट दिग्गजांनी इंग्लंड क्रिकेट संघाचे ICC टी-20 विश्वचषक 2022 चे विजेतेपद जिंकल्याबद्दल अभिनंदन केले. टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव करून इंग्लंडने दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. त्याने रविवारी मेलबर्नमध्ये पाच गडी राखून विजय नोंदवला.

इंग्लंडच्या या विजयाचा हिरो ठरला बेन स्टोक्स आणि सॅम करण. स्टोक्सने अंतिम सामन्यात विकेट घेण्यासोबतच 49 चेंडूत 52 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याचवेळी सॅम करनने अंतिम फेरीत तीन विकेट घेतल्या. त्याने या स्पर्धेत एकूण 13 विकेट घेतल्या. करणला फायनलमध्ये प्लेअर ऑफ द मॅच तसेच प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार मिळाला. जॉस बटलरच्या नेतृत्वाखालील संघ चॅम्पियन बनताच, सोशल मीडियावर त्यांच्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला.

हेही वाचा: Blog | T20 WC 22 : भरल्या 'पोटा'वर क्रांती होत नसते; बाबर लढून हरला, रोहितचं काय?

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग आपल्या ट्विटमध्ये म्हणातो की, 'सासऱ्यांचे अभिनंदन. दबावाखाली बेन स्टोक्सने शानदार खेळी केली. युवराज सिंगची पत्नी हेजल कीज ही इंग्लंडची रहिवासी आहे. हेजल कीजने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे.

हेही वाचा: Sam Curran : सॅम करनने इतिहास रचला! यापूर्वी एकाही टी 20 वर्ल्डकपमध्ये असं कधी झालं नव्हतं

138 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. 45 धावांवर तीन गडी गमावले. यानंतर हॅरी ब्रूक आणि बेन स्टोक्स यांनी 39 धावांची भागीदारी करत डाव सांभाळला. ब्रूक बाद झाल्यानंतर बेन स्टोक्स आणि मोईन अली (19 धावा) यांच्यात पाचव्या विकेटसाठी 48 धावांच्या भागीदारीने इंग्लंडचा विजय निश्चित केला. स्टोक्सने 49 चेंडूत 52 धावा केल्या ज्यात 5 चौकार आणि 1 षटकार आहे.

तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजी करताना पाकिस्तान संघाला आठ विकेट्सवर केवळ 137 धावा करता आल्या. शान मसूदने सर्वाधिक 38 धावांची खेळी खेळली. बाबर आझमने 32 आणि शादाब खानने 20 धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून सॅम करनने शानदार गोलंदाजी करताना तीन बळी घेतले.