PAK vs NZ: पाकड्यांशी भिडायला किवींनी संघात १, २ नव्हे तर ३ बदल केले, पण पावसाने सगळे गणितच बिघडवले! आता पुढचे समीकरण काय?

NZ vs PAK Match Abandoned: कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणारा पाकिस्तान आणि न्यूझीलंड सामना फक्त टॉसपर्यंत पोहोचला. त्यानंतर हलक्या रिमझिम पावसाला सुरुवात झाली. पंचांनी सामना रद्द केला.
NZ vs PAK Match Abandoned

NZ vs PAK Match Abandoned

ESakal

Updated on

पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सुपर ८ सामना रद्द करण्यात आला आहे. पावसामुळे सामन्यात एकही चेंडू टाकण्यात आला नाही. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु पाऊस सुरूच राहिला. सामना अधिकाऱ्यांनी सामना पाच षटकांचा करण्याचा प्रयत्न केला. परंतु सर्व प्रयत्न अयशस्वी झाले. पहिला सुपर ८ सामना रद्द झाल्यामुळे पाकिस्तान आणि न्यूझीलंडला प्रत्येकी एक गुण मिळाला. यामुळे पाकिस्तानसाठी आणखी वाईट बातमी आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com