Bangladesh Likely Out of T20 World Cup 2026
esakal
आगामी टी-२० विश्वकप स्पर्धेत बांगलादेशचा संघ सहभागी होणार की नाही, याबाबत आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. आयसीसीचे अध्यक्ष जय शहा आज यासंदर्भातील घोषणा करणार असल्याचं सांगितलं जातं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव बांगलादेशच्या संघाने भारतात खेळण्यास नकार दिला आहे. आपले सामने भारत ऐवजी श्रीलंकेत घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र, आयसीसीने ही मागणी फेटाळून लावली असल्याने बांगलादेशसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.