esakal | ICC T20 Rankings: कोहली फायद्यात; केएल राहुल 'ना नफा ना तोटा'
sakal

बोलून बातमी शोधा

KL Rahul and Virat Kohli

ICC T20 Rankings: कोहली फायद्यात; केएल राहुल 'ना नफा ना तोटा'

sakal_logo
By
सुशांत जाधव

ICC T20 Rankings: दक्षिण अफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेनंतर आयसीसीच्या टी-20 क्रमवारीत बदल झाला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत धमाकेदार कामगिरी करुन दाखवणाऱ्या विकेट किपर बॅट्समन क्विंटन डिकॉकने आपल्या कारकिर्दितील सर्वोच्च रँकिंग मिळवले आहे. श्रीलंके विरुद्धच्या मालिकेत बॅक टू बॅक 2 अर्धशतके झळकावत त्याने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. त्याच्या या कामगिरीनंतर तो क्रमवारीत आठव्या स्थानावर पोहचला आहे. दक्षिण आफ्रिकेनं या मालिकेत श्रीलंकेला 'व्हाइट वॉश' केलं होतं.

फलंदाजी क्रमवारीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या स्थानात एका क्रमांकाने सुधारणा झाली आहे. तो पाचव्या स्थानावरुन चौथ्या क्रमांकावर पोहचलाय. दुसरीकडे लोकेश राहुलने आपले सहावे स्थान कायम राखले. टी-20 क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत केवळ दोन भारतीय फलंदाज टॉप टेनमध्ये आहेत. इंग्लंडचा डेविड मलान 841 गुणांसह अव्वलस्थानी आहे. त्याच्यापाठोपाठ बाबर आझम (819), एरॉन फिंच (733) यांचा क्रमांक लागतो. न्यूझीलंडचा डेवॉन कॉन्वे 700 गुणांसह अव्वल पाचमध्ये आहे.

हेही वाचा: रोनाल्डोचा गोल ठरला फोल; यंग बॉईजनं उडवला धुव्वा

गोलंदाजी क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा तरबेज शम्सी 775 गुणासह अव्वलस्थानी आहे. यात एकाही भारतीय गोलंदाजाला पहिल्या दहामध्ये स्थान मिळवता आलेले नाही. भुवनेश्वर कुमार 594 गुणांसह 12 व्या स्थानावर आहे. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर 18 व्या स्थानावर असल्याचे दिसते. अष्टपैलू खेळाडंच्या यादीत अफगाणिस्तानचा नवनियुक्त कर्णधार मोहम्मद नबी अव्वलस्थानी आहे. यातही एकाही भारतीय खेळाडूला पहिल्या दहामध्ये स्थान मिळवता आलेले नाही.

loading image
go to top