esakal | रोनाल्डोचा गोल ठरला फोल; यंग बॉईजनं उडवला धुव्वा
sakal

बोलून बातमी शोधा

C Martins And Ronaldo

रोनाल्डोचा गोल ठरला फोल; यंग बॉईजनं उडवला धुव्वा

sakal_logo
By
सुशांत जाधव

UEFA Champions League : स्वित्झर्लंडच्या यंग बॉईजने रोनाल्डोसह दिग्गजांनी बहरलेल्या मँचेस्टर युनायटेडची हवा काढली. चॅम्पियन लीगमधील पहिल्या लढतीत यंग बॉईजने 2-1 असा विजय नोंदवत सर्वांनाचा आश्चर्यचकित केले. रोनाल्डो जेडन सांचो, पॉल पोगबा या दिग्गज स्टार्संनी बहरलेल्या संघासमोर ते विजय नोंदवतील, अशी कल्पनाही कुणी केली नसेल.

यंग बॉईजकडून जार्डन सीबाचेउने अखेरच्या क्षणी डागलेला गोल सामन्याचे पारडे पलटणारा ठरला. 12 वर्षानंतर जुन्या मँचेस्टर क्लबकडून खेळताना रोनाल्डोने गोल डागला. पण त्याचा हा गोल 10 मॅनसह खेळणाऱ्या संघाला विजय मिळवून देण्यात पुरेसा ठरला नाही.

हेही वाचा: IPL 2021: 'मुंबई इंडियन्स'चं नवं थीम साँग लाँच; पाहा VIDEO

यंग बॉईजचे घरचे मैदान असलेल्या बर्नच्या स्टेडियमवर रोनाल्डोने आपल्या क्लबला जोरदार सुरुवात करुन दिली. सामन्याच्या 13 व्या मिनिटाला रोनाल्डोनं अप्रतिम गोल डागला. संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून देणारा गोल रोनाल्डोच्या चॅम्पियन लीग स्पर्धेतील 135 वा गोल होता.

हेही वाचा: IPL 2021 : खूशखबर; प्रेक्षकांसाठी स्टेडियमचे उघडले दरवाजे!

दमदार सुरुवात केलेल्या युनायटेडला 35 व्या मिनिटात मोठा धक्का बसला. एरॉन बिसाकाने यंग बॉईजच्या क्रिस्टोफर मार्टिस परेराला दिलेले चॅलेंज युनायटेडला चांगलेच महागात पडले. मॅच रेफ्रींनी बिसाकाला रेड कार्ड दाखवले. त्यामुळे संघाला 10 खेळाडूंसह खेळावे लागला. परिणामी 66 व्या मिनिटाला यंग बॉईज एंगामलेयुने सामन्यात 1-1 असा बरोबरीचा गोल डागला. अखेरच्या क्षणी 90+5 या अतिरिक्त वेळात जार्डन सीबाचेउने गोली चकवा देत संघाला 2-1 असा विजयी गोल मिळवून दिला.

loading image
go to top