ICC Test Rankings | सहा वर्षात जे झालं नाही ते झालं! 'विराट' रँकिंगची मोठी घसरण

ICC Test Batting Rankings Virat Kohli
ICC Test Batting Rankings Virat Kohli esakal

दुबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यानंतर आयसीसी कसोटी बॅटिंग रँकिंगमध्ये (ICC Test Batting Ranking) मोठे बदल झाले आहे. भारताची रन मशिन विराट कोहली कसोटी रँकिंगमधील टॉप 10 मधून बाहेर पडली आहे. गेल्या सहा वर्षात पहिल्यांदाच विराट कोहली (Virat Kohli) कसोटी रँकिंगमध्ये पहिल्या 10 मध्ये दिसणार नाही.

ICC Test Batting Rankings Virat Kohli
धोनीच्या वाढदिवसादिवशी आंध्र प्रदेशच्या चाहत्यांचे खास गिफ्ट

दुसऱ्या बाजूला इंग्लंडविरूद्धच्या कसोटी सामन्यात दमदार फलंदाजी करणाऱ्या ऋषभ पंतने (Rishabh Pant) मोठी उसळी घेतली आहे. पंतने पहिल्या डावात 146 धावांची शतकी खेळी केली. तर दुसऱ्या डावात 57 धावांची अर्धशतक खेळी केली. या खेळीमुळे ऋषभ पंत कसोटी रँकिंगमध्ये सहाव्या स्थानावर पोहचला आहे. कारकिर्दित पहिल्यांदाच तो कसोटी रँकिंगमध्ये पाचव्या स्थानावर आहे.

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली मात्र टॉप टेनमधून बाहेर पडला. तो आता 13 व्या स्थानावर पोहचला आहे. भारताचा सध्याचा कर्णधार रोहित शर्मा एजबेस्टन कसोटीत खेळला नव्हता. त्याचीही रँकिंग एका अंकाने घसरली आहे. इंग्लंडचा फलंदाज जो रूट ज्याने दुसऱ्या डावात 142 धावा केल्या तो कसोटी बॅटिंग रँकिंगमध्ये टॉपवर पोहचला आहे. त्या खालोखाल ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅम्बुश्चग्ने दुसऱ्या तर स्टीव्ह स्मिथ तिसऱ्या स्थानावर आहेत.

ICC Test Batting Rankings Virat Kohli
Shikhar Dhawan | विंडीज दौऱ्यात शिखर धवन असणार टीम इंडियाचा कर्णधार

जो रूटबरोबर (Joe Root) भारताविरूद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यात शतक ठोकणाऱ्या जॉनी बेअरस्टोने (Jonny Bairstow) देखील आयसीसी रँकिंगमध्ये 11 स्थानांनी सुधारणा करत 10 वे स्थान पटकावले आहे. बेअरस्टोने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 55.36 च्या सरासरीने 1218 धावा केल्या आहेत. त्यात सहा शतकांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com