Shikhar Dhawan | विंडीज दौऱ्यात शिखर धवन असणार टीम इंडियाचा कर्णधार

Indian odi team announced For west indies tour shikhar dhawan appointed as captain
Indian odi team announced For west indies tour shikhar dhawan appointed as captainesakal

मुंंबई : भारताने येत्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी संघाची घोषणा झाली आहे. भारताचा डावखुरा सलामीवीर शिखर धवनला कर्णधार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे इंग्लंड दौऱ्यावर होणाऱ्या तीन वनडे आणि तीन टी 20 संघात शिखर धवनचा समावेश नव्हता. मात्र वेस्ट इंडिज दौऱ्यावर त्याला वनडे संघाचा थेट कर्णधारच करण्यात आले आहे. (Indian odi team announced For west indies tour shikhar dhawan appointed as captain)

Indian odi team announced For west indies tour shikhar dhawan appointed as captain
Wimbledon | कोचने फस्त केले 27 योगर्ट; विम्बल्डनने सर्व खेळाडूंनाच दिला इशारा
Indian odi team announced For west indies tour shikhar dhawan appointed as captain
Bazball | पाचव्या कसोटीत 'बॅझबॉल'चीच चर्चा, द्रविड विचारतोय काय आहे प्रकरण?

भारत 22 जुलैपासून भारत वेस्ट इंडीज दौऱ्यावर तीन वनडे आणि पाच टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही मालिका इंग्लंड दौऱ्यानंतर लगेचच सुरू होत असल्याने बीसीसीआयने भारतीय वनडे संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विंडीज दौऱ्यावर भारताचा नवखा संघ जाणार आहे. या संघाची धुरा भारताचा अनुभवी सलामीवीर शिखर धवनकडे सोपवण्यात आली आहे. तर उपकर्णधार म्हणून रविंद्र जडेजाची निवड करण्यात आली आहे.

याचबरोबर बीसीसीआयने विराट कोहली, रोहित शर्मा, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली आहे. तसेच संजू सॅमसनने टी 20 पाठोपाठ वनडेतही भारतीय संघात पुनरागमन केले आहे. तर शुभमन गिलने देखील संघात पुनरागमन केले आहे.

Indian odi team announced For west indies tour shikhar dhawan appointed as captain
क्रिकेट अन् फक्त क्रिकेट! टीम इंडियाचा आता रात्रीस खेळ चाले

भारतीय संघ

शिखर धवन (कर्णधार), रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन, संजू सॅमसन, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com