esakal | Test Rankings : स्मिथनं घेतली केनची जागा; कोहलीही फायद्यात!
sakal

बोलून बातमी शोधा

Smith Ken and Virat

Test Rankings : स्मिथनं घेतली केनची जागा; कोहलीही फायद्यात!

sakal_logo
By
सुशांत जाधव

WTC Final च्या मेगा लढतीपूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat kohli) याच्या रँकिंगमध्ये सुधारणा झालीये. आयसीसीने नुकत्याच जारी केलेल्या कसोटी क्रमवारीत (ICC Test Ranking) किंग कोहली चौथ्या स्थानावर पोहचलाय. त्याच्या स्थानात एका क्रमांकाने सुधारणा झालीये. दुसरीकडे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने पहिले स्थान गमावले आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ अव्वलस्थानी विराजमान झालाय. इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टेस्टला मुकल्याचा केन विल्यमसनला फटका बसलाय.

स्टीव स्मिथ बॉक्सिंग डे टेस्टनंतर पहिल्यांदाच आयसीसीच्या क्रमवारीत टॉपला पोहचला आहे. केन विल्यमसन याने दुखापतीमुळे इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातून माघार घेतली होती. याशिवाय पहिल्या कसोटी सामन्यातही तो नावाला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरला होता. परिणामी त्याला अव्वलस्थान गमवावे लागले.

हेही वाचा: मिताली-झुलनचा खास विक्रम, द्रविड-गांगुलीला टाकले मागे

कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियन मार्नस लाबुशेन तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या खात्यात 878 प्वाइंट्स जमा आहेत. कोहलीच्या खात्यात 814 प्वाइंट्स असून तो चौथ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात दमदार कामगिरी करुन किंग कोहलीला क्रमावरीत आणखी सुधारणा करण्याची संधी आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूट 797 पॉइंट्स मिळवून पाचव्या स्थानावर आहे. भारतीय संघाचा विकेट किपर फलंदाज रिषभ पंत आणि रोहित शर्मा 747 पॉइंट्स सह सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहेत. स्मिथच्या खात्यात 891 रेटिंग प्वाइंट्स आहेत. 167 टेस्टमध्ये तो टॉपला राहिला आहे. गॅरी सोबर्स (189 ) आणि विव रिचर्ड्स (179) यांच्या पंक्तींत तो तिसऱ्या स्थानावर आहे.

हेही वाचा: WTC : 15 पैकी 6 जण टीम इंडियाच्या प्लेइंग XI मध्ये फिक्स!

गोलंदाजीमध्ये भारतीय संघाचा अनुभवी गोलंदाज रविचंद्रन अश्विन 850 पॉइंट्स सह दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत पॅट कमिन्स 908 पॉइंट्स सह अव्वलस्थानी आहे. पहिल्या 10 गोलंदाजांमध्ये अश्विन हा एकमेव भारतीयाचा समावेश आहे. अष्टपैलूंच्या यादीत वेस्टइंडिजचा जेसन होल्डर अव्वलस्थान कायम राखले आहे. रविंद्र जडेजा 386 आणि अश्विन 353 पॉइंटसह दुसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.

loading image