U19 World Cup : सलामीच्या लढतीत युवा टीम इंडियाच्या कॅप्टनचा जलवा! आफ्रिकेसमोर 233 धावांचे लक्ष्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India U19 vs South Africa U19

U19 World Cup : सलामीच्या लढतीत युवा टीम इंडियाच्या कॅप्टनचा जलवा!

ICC Under 19 World Cup 2022, India U19 vs South Africa U19 : अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत युवा टीम इंडियाच्या कर्णधाराने नावाला साजेसा खेळ करत संघाचा डाव सावरला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर रघुवंशी (Angkrish Raghuvanshi) 5 (15) आणि हरनूर सिंग (Harnoor Singh) 1(3) ही जोडी स्वस्तात माघारी फिरली.

2 बाद 11 अशी धावसंख्या असताना कॅप्टन यश धूल (Yash Dhull) ने राशिदच्या ( Shaik Rasheed) साथीनं संघाचा डाव सावरला. या जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी 77 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. राशिद 31 धावांवर बाद झाला. त्यानंतर कॅप्टन्सीला साजेसा खेळ करत यश थूलनं अर्धशतक झळकावले. सलामीच्या लडथीत तो शतकी खेळी करेल, असे वाटत होते पण 82 धावांवर तो धावबाद झाला. त्याचे शतक हुकले असले तरी त्याच्या खेळीनं टीम इंडियाला अडचणीतून बाहेर काढले.

कुशल सिंधूनं 25 चेंडूत 27 धावा केल्या. कुशल तांबेनं तळाच्या फलंदाजीत 44 चेंडूंचा सामना करत 35 धावांचे योगदान दिले. पण अन्य खेळाडूंना मैदानात तग धरता आला नाही. भारतीय संघाचा डाव 46.5 षटकात 232 धावांत आटोपला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला 233 धावांचे लक्ष्य मिळाले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :World CupCricket
loading image
go to top