JioStar Legal Action Threat Over India vs Pakistan T20 World Cup Match
esakal
टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील १५ फेब्रुवारीला होणारा भारताविरुद्धचा सामना न खेळल्यास स्पर्धेचे ब्रॉडकास्टर्स जिओस्टार कायदेशीर कारवाई करेल, असे इशारा आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट मंडळाला दिला आहे. ही माहिती पाक मंडळानेच उघड केली आहे. विश्ककरंडक स्पर्धेतील सर्वात चर्चेत असलेली भारताविरुद्धची कोलंबोत नियोजित असलेली लढत आमचा संघ खेळणार नाही, असे पाकिस्तान सरकारने एक्सद्वारे जाहीर केले; परंतु पाकिस्तान क्रिकेट मंडळाने आयसीसीला अधिकृतपणे अद्याप कळवलेले नाही.