VIDEO : कॅरेबियन छोरीचा अफलातून कॅच; जॉन्टीही होईल आवाक् | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ICC Womens World Cup 2022

VIDEO : कॅरेबियन छोरीचा अफलातून कॅच; जॉन्टीही होईल आवाक्

ICC Womens World Cup 2022 : महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील सातव्या सामन्यात वेस्ट इंडिज महिला संघाने तगड्या इंग्लंड महिला संघाला 7 धावांनी पराभूत केले. या विजयासह वेस्ट इंडीज महिला संघ सलग दुसऱ्या विजयासह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. इंग्लंड महिलांचा स्पर्धेतील सलग दुसरा पराभव असून त्यांच्या अस्तित्वाचा मोठा प्रश्न आता निर्माण झाला. वेस्ट इंडीज महिला संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना निर्धारित 50 षटकात 225 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंड महिला संघाचा डाव 218 धावांत आटोपला.

धावांचा पाठलाग करताना इंग्लंड महिला संघाने सावध सुरुवात केली. पण धावफलकावर 31 धावा असताना शमिला कोन्नेल (Shamilia Connell ) हिने इंग्लंडला पहिला धक्का दिला. इंग्लंडची सलामीची बॅटर लॉरेन विनफिल्ड हिल (Lauren Winfield Hill) ही अवघ्या 12 धावाची भर घालून तंबूत परतली. ही विकेट शमिलाच्या खात्यात जमा झाली असली तरी त्याचे खरे श्रेय जाते ते डोट्टीन हिच्या चपळ क्षेत्ररक्षणाला. विनफिल्ड हिलनं शॉर्ट अँण्ड ऑफ लेंथ चेंडू बॅकवर्ल्ड पाँइंटच्या दिशेने फटकावला होता.

हेही वाचा: रावळपिंडी खेळपट्टीवरून पाकची फजिती; ICC च्या रेटिंगकडे लक्ष

डाव्या बाजूला अप्रतिम उडी मारून डेंड्रा डोट्टीन (Deandra Dottin) हिने एका हातात जबरदस्त झेल टिपला. क्रिकेटच्या मैदानातील अप्रतिम क्षेत्ररक्षणाने क्रिकेट चाहत्यांच्या गळ्यातील ताईत झालेला दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर जॉन्टी ऱ्होड्सही हा झेल बघून आवाक् होईल, असाच अफलातून कॅच तिने टिपला. अनेकांना हा झेल पाहिल्यावर जॉन्टीच्या फिल्डिंगचीही आठवण येईल.

हेही वाचा: Video: पाकमध्ये वॉर्नरचे नखरे; कोहलीचं 'मार्केट' होणार डाऊन?

वर्ल्ड कप स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत वेस्ट इंडीज संघाने यजमान न्यूझीलंड संघाला 3 धावांनी पराभूत केले होते. इंग्लंडला पराभूत करत त्यांनी स्पर्धेत उलटफेर करण्यासाठी सज्ज आहोत, याचे संकेतच दिले आहेत. दुसऱ्या बाजूला इंग्लंड महिलांना पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्विकारावा लागला होता. या पराभवामुळे स्पर्धेतील अस्तित्व टिकवण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर निर्माण होत आहे.

Web Title: Icc Womens World Cup 2022 West Indies Women Vs England Women 7th Match Watch Super Catch

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..