esakal | ICC WTC Points Table : पाक आठवड्याभराचा पाहुणा; टीम इंडिया टॉपला
sakal

बोलून बातमी शोधा

Team India

ICC WTC Points Table : पाक आठवड्याभराचा पाहुणा; टीम इंडिया टॉपला

sakal_logo
By
सुशांत जाधव

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यातील निकालानंतर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) गुणतालिकेत (Points Table) मोठा फेरबदल झाला आहे. इंग्लंड विरुद्धच्या ओव्हलच्या मैदानात टीम इंडियाने 157 धावांनी विजय नोंदवत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. या विजयासह टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वलस्थानी विराजमान झाली आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला लीड्सच्या मैदानातील तिसऱ्या कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवानंतर टीम इंडियाचे गुणतालिकेतील स्थानात घसरण झाली होती. पाकिस्तानने टीम इंडियाची जागा घेतली. मात्र आता पुन्हा पाकिस्तानला खाली खेचत टीम इंडियाने अव्वलस्थान गाठले आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिका 2021-23 च्या हंगामातील आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग आहे. टीम इंडियाच्या खात्यात 2 विजय आणि 1 पराभवासह 1 अनिर्णित सामन्यांची नोंद आहे. या कामगिरीसह टीम इंडियाच्या खात्यात 26 गुण जमा झाले आहेत. 54.17 पर्सेंटेजसह टीम इंडिया टॉपला आहे. पाकिस्तानचा संघ या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी दोन कोसोटी सामन्यातील 1 सामना जिंकला असून 1 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. 12 गुणांसह 50 पर्सेंटेज ठेवत ते दुसऱ्या स्थानावर आहेत.

loading image
go to top