WTC Point Table : इंग्लंडचा नुसताच गाजावाजा; पाकिस्तानला व्हाईट वॉश देऊनही फायदा शून्य

ICC World Test Championship Points Table
ICC World Test Championship Points Table
Updated on

ICC World Test Championship Points Table: इंग्लंडने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानचा 3-0 असा व्हाईटवॉश करून इतिहास रचला आहे. पाकिस्तान संघाला घरच्या कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. कराचीतील नॅशनल स्टेडियमवर तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी व्हाईटवॉश पूर्ण करण्यासाठी 167 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला केवळ 55 धावांची गरज होती. आपल्याच शैलीत खेळत इंग्लंडने धावा करत इतिहास रचला.

ICC World Test Championship Points Table
PAK vs ENG: पाकिस्तान क्रिकेटमध्ये होणार भूकंप! रमीझ राजाबरोबर बाबरचे कर्णधारपद धोक्यात

सलामीवीर बेन डकेट 78 चेंडूत 82 धावा करून नाबाद राहिला, तर कर्णधार बेन स्टोक्स 43 चेंडूत 35 धावा करून नाबाद राहिला. याआधी इंग्लंडने रावळपिंडीत पाकिस्तानचा 74 धावांनी तर मुलतानमध्ये 26 धावांनी पराभव करत कसोटी मालिका जिंकली होती. जर तुम्ही पाकिस्तान-इंग्लंड कसोटी मालिकेनंतर अद्ययावत जागतिक कसोटी चॅम्पियनशिप पॉइंट्स टेबलवर नजर टाकली तर तुम्हाला दिसून येईल की स्टोक्स आणि कंपनी 46.97 च्या पॉइंट टक्केवारीसह पाचव्या स्थानावर पोहोचली आहे.

ICC World Test Championship Points Table
PAK vs ENG: इतिहासात पहिल्यांदाच असं काही घडलं, इंग्लंडने पाकिस्तानची घरच्या मैदानावरच...

सध्या सुरू असलेल्या WTC मध्ये इंग्लंडने 22 कसोटी सामने खेळले आहेत, त्यात दहा जिंकले आहेत आणि आठ गमावले आहेत, तर फक्त चार सामने अनिर्णित राहिले आहेत. त्याने शेवटच्या पाच कसोटी जिंकल्या आहेत. मात्र असे असूनही जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही. दरम्यान पाकिस्तानची पॉइंट टेबलमध्ये सातव्या स्थानावर घसरण झाली आहे. त्यांच्याकडे फक्त 56 गुण आहेत, त्यांनी त्यांच्या 12 पैकी चार सामने जिंकले आणि सहा गमावले, दोन कसोटी अनिर्णित राहिल्या. 38.89 च्या स्कोअरिंग टक्केवारीसह जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतुन बाहेर गेली.

ICC World Test Championship Points Table
Lionel Messi: 'आता विश्वविजेता म्हणून खेळायचंय' मेस्सी करतोय विचार...

पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे. त्यांनी 13 कसोटीत नऊ विजय तर एक पराभव आणि तीन अनिर्णित राहिल्या आहेत. 76.92 च्या प्रभावी टक्केवारीसह ते इतर संघांपेक्षा खूप पुढे आहेत. ब्रिस्बेन येथे नुकत्याच पार पडलेल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा सहा गडी राखून पराभव केल्यानंतर आफ्रिकेचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावरून तिसऱ्या स्थानावर घसरला आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर गेला.

गुणतालिकेत भारत 55.77 टक्के गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी 13 कसोटी सामने खेळले आहेत, त्यात सात जिंकले आहेत आणि चार पराभूत झाले आहेत, तर दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. भारताच्या आगामी सामन्यांमध्ये बांगलादेशविरुद्धची दुसरी कसोटी आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाविरुद्धच्या चार घरच्या कसोटी सामन्यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com