esakal | WTC INDvsNZ Day 2 : भारत 3 बाद 146 धावा
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs NZ

WTC INDvsNZ Day 2 : भारत 3 बाद 146 धावा

sakal_logo
By
नामदेव कुंभार

ICC World Test Championship Final : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट फायनलच्या लढतीत दुसऱ्या दिवशी खेळ अर्धा तास अगोदर सुरु होऊनही दिवसभरातील निर्धारित षटकांचा खेळ होऊ शकला नाही. पहिला दिवस पावसाने वाया गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी खेळाला सुरुवात झाली. मात्र अंधूक प्रकाशामुळे जवळपास 25 षटकांचा खेळ वाया गेला. टीम इंडियाने 3 बाद 146 धावा केल्या होत्या. खेळ थांबवला तेव्हा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली 44(124) आणि उप कर्णधार अजिंक्य रहाणे 29(79) धावांवर खेळत होते.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित आणि शुभमन गिल या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. चांगल्या सुरुवातीनंतर रोहित शर्मा पाठोपाठ शुभमन गिलच्या रुपात टीम इंडियाला दोन धक्के बसले. त्यानंतर डाव सावरण्याची जबाबदारी ही कॅप्टन कोहली आणि पुजारा यांच्या खांद्यावर पडली आहे. दोघांनी संघाच्या धावफल शंभरी पार नेला. पहिल्यांदा अंधूक प्रकाशामुळे खेळ थांबला त्यावेळी 55.3 षटकांच्या खेळात भारतीय संघाने 3 बाद 120 धावा केल्या होत्या. चहापानानंतर खेळाला सुरुवात झाली मात्र पुन्हा खेळ थांबवण्यात आला.

 • अंधूक प्रकाशामुळे पुन्हा एकदा खेळ थांबला!

विराट कोहली अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असून अजिंक्य रहाणेही संयमी खेळ करताना दिसत आहे. पण अंधूक प्रकाशामुळे खेळात वारंवार व्यत्यय निर्माण होत आहे. अंधूक प्रकाश चहापानाचा ब्रेक आणि त्यानंतर आता पुन्हा अंधूक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला.

 • खेळाला पुन्हा सुरुवात, विराट-अजिंक्य जोडी जमली

कर्णधार-उप-कर्णधार जोडी सेट झाली असून दोघांनी अर्धशतकी भागादारी पूर्ण केली आहे.

 • भारत 3 बाद 134 (58.4)

 • अंधूक प्रकाशामुळे खेळ थांबला

विराट कोहली-40 (105)* अजिंक्य रहाणे- 22(62)*

 • विराट-अजिंक्यवर टीम इंडियाची मदार

पुजारा माघारी परतल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर डाव सावरण्याची मोठी जबाबदारी येऊन पडली आहे.

 • पुजाराच्या रुपात टीम इंडियाला तिसरा धक्का, बोल्टला मिळाले यश

पुजाराने 54 चेंडूचा सामना करताना 2 चौकाराच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत अवघ्या 8 धावांची भर घातली. बोल्टने त्याला पायचित करत न्यूझीलंडला आणखी एक यश मिळवून दिले.

 • पहिल्या सत्रावर न्यूझीलंडचं वर्चस्व

रोहित-गिल यांनी सावध सुरुवात करत भारताला आश्वासक सुरुवात करुन दिली होती. मात्र, रोहित-गिल यांना एकापाठोपाठ एक बाद करत न्यूझीलंडने पहिल्या सत्रावर वर्चस्व गाजवलं आहे. सध्या विराट कोहली आणि चेतेश्व पुजारा खेळत आहे. पहिल्या सत्रा अखेर भारतानं 28 षटकांत दोन बाद 69 धावा केल्या आहेत. रोहित(34) आणि गिल(28) यांनी अर्धशतकी भागिदारी केली होती.

 • शुमन गिलला वॅगनरने केलं बाद

रोहित शर्मापाठोपाठ सलामी फलंदाज शुभमन गिलही बाद झाला आहे. वॅगनर याने गिल याला केलं झेलबाद. कोहली आणि पुजारा अनुभवी जोडी मैदानावर

 • भारताला पहिला धक्का, रोहित शर्मा बाद

  आश्वासक सुरुवातीनंतर जेमिसन यानं रोहित शर्माला झेलबाद करत पहिला धक्का दिला आहे. रोहित शर्मा 37 धावांवर बाद झाला. 20 षटकानंतर भारतीय संघानं एक गड्याच्या मोबदल्यात 62 धावा केल्या आहेत. पुजारा आणि गिल मैदानावर आहेत.

 • रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी तिसऱ्यांदा 50 धावांची भागीदारी केली आहे. पाच डावांत दोघांनी तिसऱ्यांदा 50 धावांची भागिदारी केली आहे.

 • रोहित-गिलचा अर्धशतकी धमाका

  सलामी फलंदाज रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी संयमी फलंदाजी करत भारतीय संघाला आश्वासक सुरुवात करुन दिली आहे. रोहित-गिल जोडीनं 17 षटकांत भारताचं अर्धशतक फलकावर लगावलं. रोहित शर्मा 29 तर गिल 23 धावांवर खेळत आहेत.

 • रोहित-गिलची सावध सुरुवात

  सलामीवीर रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी सावध सुरुवात केली आहे. दहा षटकानंतर भारतीय संघानं बिनबाद 37 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा 21 तर गिल 15 धावांवर खेळत आहेत.

टीम इंडियाची मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली

देशाचे प्रेरणास्त्रोत '​फ्लाइंग सिख' मिल्खा सिंग यांना टीम इंडियानं श्रद्धांजली वाहिली आहे. भारतीय संघानं दंडाला काळी पट्टी बांधून मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. शुक्रवारी रात्री मिल्खा सिंग यांचं निधन झालं आहे.

 • भारताची सावध सुरुवात -

  प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघानं सावध सुरुवात केली आहे. पहिल्या पाच षटकात रोहित-गिल जोडीनं 12 धावा केल्या आहेत. पावसामुळे वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीवर मदत मिळत आहे. अशा परिस्थितीत रोहित-गिल जोडीनं सावध सुरुवात केली आहे. रोहित शर्मा 7 तर गिल 4 धावांवर खेळत आहेत.

 • कोण जिंकणार विश्व कसोटी अजिंक्यपद????

 • न्यूझीलंडच्या यष्टरक्षकाची अखेरची मॅच; विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यानंतर होणार निवृत्त

 • विराट कोहलीचा नवीन विक्रम

 • विराट कोहलीनं मोडला धोनीचा विक्रम, कसोटीत सर्वाधिक सामन्यात कर्णधारपद भूषवण्याचा पराक्रम विराट कोहलीच्या नावावर...भारताचा माजी क्रिकेटपटू लक्ष्मण यानं कोहलीचं केलं कौतुक

 • मर्यादीत षटकांचा वर्ल्ड कप आणि टी-20 वर्ल्ड कपनंतर आयसीसीने पहिल्यांदाच कसोटीमधील मोठ्या स्पर्धेला सुरुवात केली होती. आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपच्या माध्यमातून दोन वर्षांतील कामगिरीच्या जोरावर कसोटी जगतातील नंबर वन संघ ठरवण्यात येणार आहे. विजेत्या संघाला मोठे बक्षीस आणि ट्रॉफीसह मानाची गदा देण्यात येणार आहे. पहिली वहिली-स्पर्धा जिंकून इतिहास घडवण्यासाठी दोन्ही कर्णधार सज्ज आहेत.

 • शांत आणि संयमी केन विल्यमसनसमोर आक्रमक विराट कोहलीचं आव्हान असणार आहे. 2008 मध्ये अंडर-19 च्या विश्वचषकात दोघांचा पहिल्यांदा सामना झाला होता. तेव्हापासून दोघांमध्ये मैत्री आहे. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेपूर्वी दोन मित्रांमध्ये चर्चा झाली.

 • न्यूझीलंडच्या संघात पाचही वेगवान गोलंदाज

न्यूझीलंड संघात एकही फिरकीपटू नाही. ग्रॅंडहोम आणि जेमिसन दोन वेगवान अष्टपैलूंचा संघात समावेश

 • भारतीय संघ -

  रोहित शर्मा आणि शुबमन गिल करणार डावाची सुरुवात. भारतीय संघात दोन फिरकी गोलंदाज

loading image