Virat Kohli : सामान्य कामगिरी! विराट कोहली बाबत आईसलँड क्रिकेटचे वादग्रस्त ट्विट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli Iceland Cricket Tweet

Virat Kohli : सामान्य कामगिरी! विराट कोहली बाबत आईसलँड क्रिकेटचे वादग्रस्त ट्विट

Virat Kohli Iceland Cricket Tweet : भारताची रनमशीन विराट कोहली जवळपास 3 वर्षांच्या दुष्काळातून नुकतीच बाहेर पडली आहे. विराटच्या बॅटमधून पूर्वीसारखा धावांचा ओघ देखील सुरू झाला आहे. मात्र विराट पुन्हा फॉर्ममध्ये आलेला आईसलँड क्रिकेट बोर्डाला बघवत नाहीये. आईसलँड क्रिकेट बोर्डाने एक वादग्रस्त ट्विट केले. या ट्विटचा रोख विराट कोहलीचे गेल्या तीन वर्षातील कसोटी क्रिकेटमधील कामगिरी अधोरेखित करण्याकडे होता. आईसलँडने विराट कोहलीची कसोटीमधील तीन वर्षाची आकडेवारी देत ट्विट केले.

हेही वाचा: IND vs SL 1st T20 : हार्दिक पांड्या ऋतुराज ऐवजी गुजरात टायटन्सच्या सलामीवीराला देणार संधी?

आईसलँड क्रिकेटने आपल्या अधिकृत अकाऊंटवरून ट्विट केले की, 'काही खेळाडूंना संघातून वगळले जाऊ शकत नाही. विराट कोहलीचेच उदाहरण घ्या, हे आहे त्याचे तीन वर्षाचे कसोटी मधील रेकॉर्ड

2020 : 19.33 च्या सरासरीने 116 धावा

2021 : 28.21 च्या सरासरीने 536 धावा

2022 : 26.50 च्या सरासरीने 265 धावा

गेल्या तीन वर्षातील 36 डावात विराटची सुमार कामगिरी, विराट कोहलीकडे अजून क्रिकेट शिल्लक आहे?

(Sports Latest News)