IND vs SL 1st T20 : हार्दिक पांड्या ऋतुराज ऐवजी गुजरात टायटन्सच्या सलामीवीराला देणार संधी?

India Vs Sri Lanka 1st T20 Shubman Gill
India Vs Sri Lanka 1st T20 Shubman Gillesakal

India Vs Sri Lanka 1st T20 : भारत आशिया कप विजेत्या श्रीलंकेसोबत आजपासून वानखेडे स्टेडियमवर तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेला सुरूवात करत आहे. टी 20 वर्ल्डकपमध्ये भारताला सेमी फायनलमध्येच गाशा गंडळावा लागल्यानंतर संघात आणि नेतृत्वात देखील बदल करण्यात आले आहेत. भारतीय संघाची धुरा आता हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली असून वरिष्ठ खेळाडूंऐवजी नव्या दमाच्या युवा खेळाडूंचा संघात भरणा आहे. वानखेडेवर होत असलेल्या श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात शुभमन गिल आणि राहुल त्रिपाठी यांना पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.

India Vs Sri Lanka 1st T20 Shubman Gill
Jaydev Unadkat : हॅटट्रिकच वादळ! बांगलादेशवरून आला अन् अवघ्या 12 चेंडूत दिल्लीचा धुव्वा उडवला

भारतासाठी 2022 वर्ष हे फारसे फलदायी ठरले नाही. आता 2023 मध्ये भारतीय संघ नव्या जोमाने सुरूवात करणार आहे. भारतीय संघातील अनेक अनुभवी खेळाडूंना बाजूला सारत नव्या युवा सळसळत्या रक्ताला या मालिकेत संधी मिळणार आहे. या संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्या करणार असून गेल्या वर्षात धावांचा पाऊस पाडणाऱ्या सूर्यकुमार यादवला बढती मिळाली असून तो संघाचा उपकर्णधार आहे.

आजच्या सामन्यात सलामी जोडीला कोणाला खेळवायचे हा मोठा प्रश्न हार्दिक आणि संघ व्यवस्थापनासमोर असणार आहे. यासाठी ऋतुराज गायकवाड, इशान किशन, शुभमन गिल, राहुल त्रिपाठी यांची नावे आघाडीवर आहेत. यातील शुभमन गिल आणि राहुल त्रिपाठी यांनी टी 20 पदार्पण केलेले नसून हार्दिक या दोघांनी ही संधी आजच्या सामन्यात देण्याची शक्यता आहे.

(Sports Latest News)

India Vs Sri Lanka 1st T20 Shubman Gill
Team India: भारतीय संघाने पंतसाठी 1 मिनिट 53 सेकंदाचा व्हिडीओ केला शेअर; पांड्या म्हणाला...

भारतीय संघ :

हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), युझवेंद्र चहल, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, इशान किशन, मुकेश कुमार, उमरान मलिक, शिवम मावी, अक्षर पटेल, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, राहुल त्रिपाठी

श्रीलंका संघ :

दशुन शनका (कर्णधार), पथुम निसंका, अविष्का फर्नांडो, सदीरा समरविक्रमा, कुसल मेंडीस, भानुका राजपक्षा, चरिथ असलंका, धनंजया डे सिल्वा, वानिंदू हसरंगा, अशेन बंदारा, महीश तीक्षाणा, जेफ्रे वँडरसे, चमिका रूणारत्ने, दिलशान मधुशनका, कुसून रजिथा, नुवांदू फर्नांडो, दुनिथ वेलालेगे, प्रमोद मदुशान, लाहिरू कुमारा, निवास तुषारा.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com