Virat Kohli Iceland Cricket : विराटला कसोटी शतकावरून डिवचले, फॅन्सनी आईसलँड क्रिकेटलाच घेतले फैलावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli Iceland Cricket

Virat Kohli Iceland Cricket : विराटला कसोटी शतकावरून डिवचले, फॅन्सनी आईसलँड क्रिकेटलाच घेतले फैलावर

Virat Kohli Iceland Cricket : भारताची रन मशीन विराट कोहली आता आपल्या फुल फॉर्ममध्ये परतला आहे. त्याने टी 20, वनडे मध्ये शतकांचा रतीब पुन्हा सुरू केला. मात्र कसोटी क्रिकेटमधील शतकांचा दुष्काळ अजून काही संपलेला नाही. हाच धागा पकडून आईसलँड क्रिकेटने एक खोचक ट्विट केले. या ट्विटवरून विराट कोहलीचे चाहते जाम भडकले.

आईसलँड क्रिकेटने ट्विट केला की, 'हे स्टॅट्स अनेक भारतीय चाहत्यांना आवडणार नाहीत. मात्र विराट कोहलीला कसोटी शतक ठोकून आता 23 कसोटी सामने झाले आहेत. त्याचे शेवटचे कसोटी शतक 2019 मध्ये आले होते. अजून किती काळ?'

आईसलँडच्या या ट्विटवर सेहज सिंग या चाहत्याने प्रत्युत्तर दिले. हा चाहता म्हणतो की, 'विराटने फक्त एक वर्ष झाले शतक ठोकलेले नाही. कारण 2020 आणि 2021 चे अर्धे वर्ष हे कोरोनामुळे वाया गेले. विराटसारखा माणूस ज्याच्या नावावर इतकी शतके आहेत. त्याला अजून एक वर्ष तरी संधी द्यायला हवी.'

विराट कोहलीने आशिया कप 2022 मध्ये आपला शतकांचा दुष्टाळ संपवला होता. यानंतर त्याने वनडेमध्ये देखील पाठोपाठ शतकी खेळी केल्या आहेत. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये त्याला शतकी खेळी करणे अजून जमलेले नाही. विराट कोहलीला गेल्या 13 कसोटींपासून अर्धशतक देखील ठोकता आलेले नाही.

विराट कोहलीने बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिल्या दोन कसोटीत 44, 20 आणि 12 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध शतकी खेळी केली होती. त्यानंतर विराट कोहलीला कसोटीत शतकी खेळी करण्यात यश आलेले नाही.

(Sports Latest News)

हेही वाचा : का वाढतात रिअल इस्टेटचे भाव?