Shikhar Dhawan Huma Qureshi : हुमा खुरेशी - शिखर धवन लग्न करणार होते मात्र माशी कुठं शिंकली?

Shikhar Dhawan Huma Qureshi
Shikhar Dhawan Huma QureshiESAKAL

Shikhar Dhawan Huma Qureshi : भारतीय संघातील अनेक खेळाडू हे मैदानावर स्टार तर आहेतच मात्र त्यांनी सोशल मीडिया स्टार ही उपाधी देखील पटकावली आहे. युझवेंद्र चहल, शिखर धवन यासारखे खेळाडू सातत्याने सोशल मीडियावर काहीना काही पोस्ट शेअर करत असतात. शिखर धवन सध्या भारतीय संघातून बाहेर आहे त्यामुळे त्याचा बराच काळ सोशल मीडियावर रील्स तयार करण्यात जात आहे.

मध्यंतरी शिखर धवन एका चित्रपटात देखील झळकला होता. डबल XL चित्रपटात हुमा खुरेशी आणि सोनाक्षी सिन्हा या अभिनेत्री मुख्य भुमिकेत होत्या. यावेळी शिखर धवन आणि हुमा खुरेशी यांच्यातील एक रोमँटिक व्हिडिओ देखील चांगलाच प्रसिद्ध झाला होता.

Shikhar Dhawan Huma Qureshi
IND vs AUS: टीम इंडियाची वेगवान गोलंदाज उपांत्य फेरीतून बाहेर! 'या' खेळाडूला मिळाली संधी

दरम्यानच्या काळात शिखर धवन आणि त्याची पत्नी आयेशा मुखर्जी विभक्त झाले. आता शिखर धवनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत हुमा खुरेशी शिखर धवनला फोन करते. त्यावेळी हुमा पंजाबीतून शिखरला आपलं लग्न होऊ शकत नाही असे म्हणते. यावर शिखर धवन म्हणतो की का काय झालं आपलं तर कालच लग्न झालं होते. यावर हुमा अरे तुला फोन लागला का असे उत्तर देते.

Shikhar Dhawan Huma Qureshi
IPL 2023: पंतच्या गैरहजरीत दिल्लीने 'या' भारतीय खेळाडूचं केलं प्रमोशन! कर्णधार पदाची जबाबदारी वॉर्नरकडे

हुमा आणि शिखर यांच्यातील हा संवाद एक विनोदी संवाद होता. मात्र सोशल मीडियावर हुमा आणि शिखर लग्न करणार का अशी चर्चा सुरू झाली.

शिखर धवन सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. मात्र त्याने भारतात होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये खेळण्याची आशा सोडलेली नाही. तो आपल्या फिटनेसवर आणि स्किल्सवर काम करतोय. याचबरोबर तो आयपीएलमध्ये पंजाब किंग्जचे नेतृत्व देखील करतोय. त्याला निवडसमितीचे लक्ष आपल्याकडे खेचण्याची आयपीएल ही नामी संधी आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : का वाढतात रिअल इस्टेटचे भाव?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com