...तर आज MCC पॅव्हेलियन जाळावे लागेल...असे एक इंग्रजच म्हणतोय

वृत्तसंस्था
शुक्रवार, 26 जुलै 2019

ज्या ऐतिहासिक लॉर्डसवर जगज्जेतेपद साकार करून पंधरवडा सुध्दा उलटला नाही तिथेच क्रिकेटच्या जन्मदात्या देशाला लिंबूटिंबू अशा शेजारी देशाकडून मानहानीकारक हार पत्करावी लागेल अशी चिन्हे आहेत. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया आताच उमटू लागल्या आहेत.
 

लंडन : ज्या ऐतिहासिक लॉर्डसवर जगज्जेतेपद साकार करून पंधरवडा सुध्दा उलटला नाही तिथेच क्रिकेटच्या जन्मदात्या देशाला लिंबूटिंबू अशा शेजारी देशाकडून मानहानीकारक हार पत्करावी लागेल अशी चिन्हे आहेत. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया आताच उमटू लागल्या आहेत.
यातील एक प्रतिक्रिया अत्यंत जहाल आहे. 

इंग्लिश क्रिकेटचा मानबिंदू असलेले MCC चे पॅव्हेलियन जाळावे लागेल असे ट्विट पोस्ट झाले आहे.

बीबीसी क्रिकेट प्रतिनिधी जोनाथन अग्न्यू यांनी हे ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की,
 १८८२ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी सामन्यात मानहानीकारक पराभव पत्करावा लागला तेव्हा धक्का बसलेल्या क्रिकेटप्रेमींनी बेल्स जाळल्या होत्या. आता जर आयर्लंड विरुद्ध पराभवाची नामुष्की ओढवली तर त्यांना मेरीलीबोन क्रिकेट क्लबचे पॅव्हेलियन जाळावे लागेल.

माजी कर्णधार मायकेल वॉन यांनी सुद्धा टीका केली आहे. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात नाईट वॉचमन म्हणून आलेल्या जॅक लीच याने 92 धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडचा सलामीचा प्रश्न सुटला असे त्यांनी म्हटले आहे. वर्ल्ड कप दरम्यान वॉन यांनी संघाच्या दृष्टिकोनावर टीका केली होती. त्याबद्दल जॉनी बेआरस्टॉ याने त्यांना प्रत्युत्तर दिले होते. लिच हाच अॅलिस्टर कुक याचा वारसदार आहे अशी टिप्पणी त्यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If England lose to Ireland today they will need to burn down the MCC pavilion