esakal | मुंबईने हार्दिक पंड्याला डच्चू द्यावा : सेहवाग
sakal

बोलून बातमी शोधा

सेहवाग

मुंबईने हार्दिक पंड्याला डच्चू द्यावा : सेहवाग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ‘मुंबई इंडियन्सने आगामी आयपीएल मेगा लिलावासाठी केवळ कर्णधार रोहित शर्मा, ईशान किशन व जसप्रीत बुमराह यांना आपल्या संघात कायम ठेवावे,’ असे भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने म्हटले आहे. भारतीय नियामक क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) यापूर्वीच स्पष्ट केल्यानुसार आयपीएल २०२२ स्पर्धेत सध्याच्या आठ संघांऐवजी एकूण १० संघ असतील. पुढील वर्षीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी हा मेगा लिलाव पार पडणार आहे.

आयपीएलच्या मेगा लिलावाचे नेमके नियम अद्याप जाहीर झाले नसले तरी प्रत्येक फ्रँचायजीला जास्तीत जास्त तीन खेळाडू कायम ठेवण्याची परवानगी दिली जाऊ शकते. जर तीन खेळाडू कायम ठेवण्याची परवानगी असेल, तर मुंबईने कोणत्या तीन नावांना प्राधान्य द्यावे याबाबत सेहवागचे मत अगदी स्पष्ट आहे. त्याच्या मते अष्टपैलू हार्दिक पंड्याला वगळून मुंबईने केवळ रोहित शर्मा, ईशान किशन आणि जसप्रीत बुमराह यांना संघात कायम ठेवावे. तसेच ‘जर हार्दिकने गोलंदाजी केली नाही, तर त्याच्या दुखापतीमुळे तो लिलावात मोठी रक्कमही मिळवू शकणार नाही,’ असा विश्वासही सेहवागने व्यक्त केला आहे.

‘तो (हार्दिक) गोलंदाजी करणार आहे की नाही? जर तो स्वतःला तंदुरुस्त घोषित करून गोलंदाजी सुरू करू शकला, तर संघ त्याला लिलावात खरेदी करू शकतात; अन्यथा त्याच्याकडून जर फ्रँचायजीला कुठलाही फायदा होणार नसेल तर कोणीही त्याला खरेदी करण्यात रस दाखवणार नाही, असे सेहवागने सांगितले.

loading image
go to top