esakal | कोहलीच्या 'चढ-उतारा'च्या कामगिरीवर कपिल पाजींचं मोठ वक्तव्य
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli

कोहलीच्या 'चढ-उतारा'च्या कामगिरीवर कपिल पाजींचं मोठ वक्तव्य

sakal_logo
By
सुशांत जाधव

क्रिकेट जगतातील रनमशिन विराट कोहली (Virat Kohli) सध्या धावा करतोय पण शतकापासून तो दूर राहताना दिसतोय. विक्रमादित्य सचिन तेंडुलकरचा वेगाने पाठलाग करणाऱ्या कोहलीच्या भात्यातून जवळपास 2 वर्षांपासून शतकी नजारा पाहायला मिळालेला नाही. इंग्लंड दौऱ्यावरही त्याने चांगली सुरुवात केली पण शतकापर्यंत मजल मारण्यात पुन्हा तो कमी पडला. यावरुन प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात येत आहे. दरम्यान भारतीय संघाला पहिला विश्व चषक जिंकून देणाऱ्या कपिल पाजींनी विराटच्या बाजूने बॅटिंग केल्याचे पाहायला मिळत आहे.

'अनकट' नावाच्या कार्यक्रमात कपिल देव यांनी विराट कोहली लवकरच शतकाचा दुष्काळ संपवेल, असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, ज्यावेळी तो धावा करत होता त्यावेळी कुणाला त्याच्या खेळीवर आक्षेप नव्हता. आता ज्यावेळी त्याच्या कामगिरीचा आलेखात चढ-उतार दिसतोय त्यावेळी त्याच्यासंदर्भात प्रश्न उपस्थितीत केले जात आहेत. यापूर्वी शतक आणि द्विशतक मारताना त्याच्यावर दबाव नव्हता का? असा प्रश्न उपस्थितीत करत विराट दबावात खेळतोय म्हणणाऱ्यांना कपिल पाजींना टोला लगावला आहे.

हेही वाचा: IPL 2021: 'मुंबई इंडियन्स'चं नवं थीम साँग लाँच; पाहा VIDEO

कपिल पाजी पुढे म्हणाले की, त्याच्या कामगिरीत चढ-उतार दिसत असला तरी तो फार काळ टिकणार नाही. तो अनुभवासह परिपक्व झाला असून पुन्हा लयीत आल्यावर तो शतक आणि द्विशतकावर थांबवणार नाही तर त्रिशतक झळकावले, असे कपिल देव यांनी म्हटले आहे. फिटनेसच्या जोरावर तो आपल्यातील क्षमता सिद्ध करुन दाखवेल.

इंग्लंड दौऱ्यावर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने दमदार कामगिरी करुन दाखवली. कोहलीने संघाला गरज असताना मैदानात थांबून दोन महत्त्वपूर्ण अर्धशतके झळकावली. पण त्यानंतर त्याचे शतकात रुपांतर करण्यात त्याला अपयश आले. मोठी खेळी करण्यात तो अडखळतोय. कॅप्टन्सीच्या दबावात खेळत असल्यामुळे त्याला मोठी खेळी करण्यात वांरवार अपयश येत आहे, असेही बोलले गेले. पण कपिल पाजींना मात्र विराटच्या क्षमतेवर विश्वास दर्शवला आहे. तो त्याच्या जुन्या ढंगात मोठी खेळी करेन, असेही त्यांनी म्हटले आहे.

loading image
go to top