
नवी दिल्ली, ता. २७ (पीटीआय) मी भाजपमध्ये प्रवेश केला तर माझ्यावरची बंदी लगेचच उठवली जाईल, अशी खोचक टीका ऑलिंपिक पदकविजेता मल्ला बजरंग पुनिया याने केली आहे. उत्तेजक चाचणीसंदर्भात चाचणी नमुने देण्यास नकार दिल्यामुळे बजरंगवर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.