esakal | "RCB ला जर IPL 2021 जिंकायचं असेल तर..."; गौतम गंभीरचा खास सल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

Virat-ABD-RCB

IPL 2021: "विराटच्या RCB ला जर स्पर्धा जिंकायची असेल तर..."

sakal_logo
By
विराज भागवत

सध्या विराटचा बंगळुरू संघ IPL Points Table मध्ये तिसऱ्या स्थानी

IPL 2021: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली गेल्या काही दिवसांपासून चांगल्या लयीत नाही. इंग्लंड दौऱ्यातही त्याला केवळ एक अर्धशतक ठोकता आले. त्यामुळे विराटला नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. अशा वेळी आता IPLमध्ये विराट कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच, बंगळुरूचा संघ विराटसोबतच एबी डिव्हिलियर्स याच्या खेळीवरही बराचसा निर्भर असतो. अशा परिस्थितीत कोलकाता संघाला दोन वेळा विजेतेपद जिंकवून देणारा भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने विराटच्या RCB ला एक खास सल्ला दिला.

हेही वाचा: IPL 2021: अफगाणिस्तानचे खेळाडू स्पर्धेसाठी युएईमध्ये दाखल

"विराट कोहलीसाठी सध्या एक मोठं आव्हान आहे. तसेच एबी डिव्हिलियर्ससाठीही आव्हान असणार आहे. एबी डिव्हिलियर्सने मधल्या काळात कोणतीही क्रिकेट स्पर्धा खेळलेली नाही. त्यामुळे त्याला पटकन खेळ आत्मसात करावा लागेल आणि चांगली कामगिरी करावी लागेल. तसेच, विराट कोहलीसाठीही ही आव्हानाची घडी आहे. गेले काही महिने भारत कसोटी सामने खेळत आहे. त्यामुळे कसोटी ते टी२० अशी फलंदाजीची विचारसरणी आत्मसात करण्याचे आव्हान विराटपुढे असणार आहे. बंगळुरू संघाची मदार ही प्रामुख्याने या दोन खेळाडूंवर असते. त्यामुळे जर RCB संघाला IPL 2021 जिंकायचं असेल, तर या दोघांना दमदार खेळ करावा लागेल", असं स्पष्ट मत त्याने व्यक्त केले.

विराट, रोहित नव्हे तर 'हा' फलंदाज ठोकेल ४० चेंडूत शतक

"IPL किंवा कोणत्याही टी२० सामन्यात शतक ठोकणं हे खूप कठीण आहे. पण अनेक खेळाडूंनी टी२० सामन्यात शतक ठोकण्याची किमया साधली आहे. अवघ्या ४० चेंडूत शतक मारण्याची क्षमतादेखील एका फलंदाजांमध्ये आहे. ४० चेंडूत शतक ठोकायचे असेल तर खूपच चांगला स्ट्राईक असावा लागतो. त्या स्ट्राईक रेटने खेळून संपूर्ण डाव सावरण्याची क्षमता असलेला क्रिकेटपटू म्हणजे लोकेश राहुल. त्याची खेळी आणि फॉर्म पाहता तो नक्कीच ४० चेंडूत १०० धावांची खेळी करू शकतो", असा विश्वास गंभीरने व्यक्त केला.

loading image
go to top