ENG vs IND : विराटला तेंडुलकर - गावसकरांच्या पंक्तीत बसण्याची संधी

If Virat Kohli Runs 40 Runs He Will Join Sachin Tendulkar Sunil Gavaskar Elite Club
If Virat Kohli Runs 40 Runs He Will Join Sachin Tendulkar Sunil Gavaskar Elite Clubesakal

बर्मिंगहम : इंग्लंड आणि भारत (England vs India) यांच्यात होणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यात (ENG vs IND 5th Test) सर्वांची नजर विराट कोहलीवर असणार आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय फलंदाजीची मदार ही विराट कोहलीवर (Virat Kohli) असणार आहे. आजच्या सामन्यात भारताने पहिल्या सत्रात शुभमन गिल (17) आणि चेतेश्वर पुजारा (13) हे दोन सलामीवीर गमावले. पावसाचा व्यत्यय आला त्यावेळी हनुमा विहारी 14 तर विराट कहली 1 धाव करून नाबाद होते.

If Virat Kohli Runs 40 Runs He Will Join Sachin Tendulkar Sunil Gavaskar Elite Club
Malaysia Open : पी. व्ही. सिंधू उपांत्यपूर्व फेरीत पराभूत

40 धावा - फॉर्ममध्ये परतत असलेल्या विराट कोहलीसाठी हा सामना खास ठरण्याची शक्यता आहे. या सामन्यात विराट कोहली अनेक विक्रम करू शकतो. विराट कोहली इंग्लंड विरूद्ध 2000 कसोटी धावा करण्यापासून 40 धावा दूर आहे. जर त्याने एजबेस्टन कसोटीत 40 धावा केल्या तर तो सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) या महान फलंदाजांच्या पंक्तीत बसेल. या दोघांनीच इंग्लंड विरूद्ध कसोटीत 2000 धावा केल्या आहेत.

55 धावा - इंग्लंडविरूद्ध विराटने आतापर्यंत 1960 धावा केल्या आहेत. त्याने या 27 कसोटीतील 48 डावात या धावा केल्या आहेत. विराटने इंग्लंडविरूद्ध आतापर्यंत 5 कसोटी शतके आणि 9 अर्धशतके ठोकली आहेत. कोहलीने कसोटीत 235 सर्वोच्च धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकरने 36 डावात इंग्लंडविरूद्ध 2000 धावा केल्या आहेत. तर गावसकर यांनी 47 डावात ही कामगिरी केली होती. कोहलीला 2000 धावांचा आकडा पार करण्यासाठी 48 किंवा 49 डाव लागतील.

If Virat Kohli Runs 40 Runs He Will Join Sachin Tendulkar Sunil Gavaskar Elite Club
बुमराहला कर्णधार केल्याने जाफर नाराज; 95 कसोटी खेळणाऱ्याला सोडून...

याचबरोबर विराट कोहलीने इंग्लंडविरूद्ध त्यांच्याच देशात एकूण 945 कसोटी धावा केल्या आहेत. तो इंग्लंडमध्ये 1000 धावा पूर्ण करण्यापासून 55 धावा दूर आहे. गेल्यावेळी 2018 मध्ये एजबेस्टनमध्ये विराट कोहलीने इंग्लंडविरूद्ध पहिल्या कसोटीत 149 धावांची दमदार खेळी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com