
Tennis Updates: दुसरी मानांकित इगा स्विअतेक व प्रथम मानांकित यानिक सिनर या स्टार खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँडस्लॅममधील विजयी वाटचाल कायम ठेवली. स्विअतेक हिने महिला एकेरीमध्ये, तर सिनर याने पुरुषांच्या एकेरीत गुरुवारी विजय मिळवला.
पाच वेळची ग्रँडस्लॅम विजेती इगा स्विअतेक हिने ४९व्या स्थानावरील रेबेका स्त्रामकोवा हिच्यावर ६-०, ६-२ असा सहज विजय मिळवला. स्विअतेक हिने पहिल्या सेटमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवले. तिच्या प्रभावी खेळासमोर रेबेकाचा निभाव लागला नाही. अखेर स्विअतेक हिने ६-० अशी बाजी मारली.