IND vs BAN: 'आईशप्पथ लई टेन्शन आलेलं...' दुसऱ्या कसोटी विजयानंतर कर्णधार राहुलचे विधान

ind vd ban kl rahul after winning series against bangladesh tension in dressing room cricket news kgm00
ind vd ban kl rahul after winning series against bangladesh tension in dressing room cricket news kgm00 ेोकोत

India vs Bangladesh 2nd Test : भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने 2-0 असा विजय मिळवला. बांगलादेशविरुद्धचा दुसरा सामना 3 गडी राखून जिंकून संघाने एकही कसोटी सामना न गमावण्याचा विक्रम कायम राखला आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करणाऱ्या केएल राहुलने मालिका जिंकल्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ड्रेसिंग रूमच्या स्थितीचे वर्णन करताना तो म्हणाला की, आईशप्पथ लई टेन्शन आलेलं होते.

ind vd ban kl rahul after winning series against bangladesh tension in dressing room cricket news kgm00
WTC Points Table: भारताची चार टक्केने वाढ, आफ्रिका अन् श्रीलंकेला फुटला घाम, जाणून घ्या समीकरण

सामन्यानंतर बोलताना केएल राहुल म्हणाला की, “पण मी खोटं बोलणार नाही, ड्रेसिंग रूममध्ये खूप तणाव होता. फलंदाजी करणे अवघड होते, दोन्ही डावात त्यांनी आमच्यावर दबाव आणला होता. हा काहीसा नवीन चेंडूचा भाग होता, एकदा चेंडू जुना झाला की धावा काढणे सोपे होते. लक्ष्याचा पाठलाग करताना आम्ही आणखी काही विकेट गमावल्या पण आम्ही काम पूर्ण केले. गेल्या काही वर्षांपासून गोलंदाजी आक्रमण हा एक मुद्दा आहे. गेल्या काही वर्षात परदेशात कुठेही गेलो तरी काम पूर्ण केले.

ind vd ban kl rahul after winning series against bangladesh tension in dressing room cricket news kgm00
IND vs SL: कोरोनाची भीती वाढली! श्रीलंकेविरुद्ध मालिकेआधी BCCI च्या नव्या गाईडलाईन्स

दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने बांगलादेशचा तीन गडी राखून पराभव केला. त्यांनी सामन्याच्या चौथ्या दिवशी 7 गडी गमावून 145 धावांचे लक्ष्य गाठले. श्रेयस अय्यर आणि रविचंद्रन अश्विन यांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. यासह भारताने बांगलादेशचा दोन सामन्यांच्या मालिकेत 2-0 असा व्हाईटवॉश केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com