WTC Points Table: भारताची चार टक्केने वाढ, आफ्रिका अन् श्रीलंकेला फुटला घाम, जाणून घ्या समीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 India strengthen World Test Championship Final chances with series sweep over Bangladesh wtc points table ind vs ban cricket news

WTC Points Table: भारताची चार टक्केने वाढ, आफ्रिका अन् श्रीलंकेला फुटला घाम, जाणून घ्या समीकरण

India vs Bangladesh : भारतीय क्रिकेट संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये आणखी एक मालिका जिंकली आहे. भारताने ढाका कसोटीत बांगलादेशवर सनसनाटी विजय मिळवून आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप क्रमवारीत आपले स्थान मजबूत केले. त्यामुळे दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेला घाम फुटला आहे. मात्र भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे असे नाही. अंतिम फेरी गाठण्यासाठी भारतीय संघाला त्यांच्या भूमीवर चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा सामना करायचा आहे. (India strengthen World Test Championship Final chances with series sweep over Bangladesh)

हेही वाचा: IND vs BAN 2nd Test : विराटने घातलेला गोंधळ अय्यर-अश्विनने सावरला; भारत हरता हरता जिंकला

चट्टोग्राम येथे बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत विजय मिळवल्यानंतर भारत जागतिक कसोटी चॅम्पियनशिप क्रमवारीत तिसऱ्यावर स्थानावर पोहोचला होता. गेल्या आठवड्यात ब्रिस्बेनमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्यानंतर भारत दूसऱ्या स्थानावर आला. ढाका येथील विजयामुळे भारताने त्यांचे दुसरे स्थान मजबूत केले आहे, त्यांच्या विजयाची टक्केवारी 55.77 वरून 58.93 पर्यंत वाढली आहे. ऑस्ट्रेलिया गुणतालिकेत शीर्षस्थानी आहे तर दक्षिण आफ्रिका (54.55%) आणि श्रीलंका (53.33%) अनुक्रमे 3 आणि 4 वर भारताच्या अगदी मागे आहेत.

हेही वाचा: Ind vs Ban 2nd Test: हुश्श जिंकलो एकदाचे! भारताचा बांगलादेशला क्लीन स्वीप

WTC 23 च्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या शर्यतीत आता फक्त चार संघ आहेत, ज्यात ऑस्ट्रेलिया, भारत, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. त्याचबरोबर अंतिम शर्यतीतून बाहेर पडणारा पाकिस्तान हा पाचवा संघ ठरला आहे. पाकिस्तानपूर्वी इंग्लंड, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि बांगलादेशचे संघ याआधीच बाहेर पडले आहेत. याशिवाय, या विजयासह भारतीय संघाने विजयाची टक्केवारी वाढवली आहे.

हेही वाचा: IND vs SL: कोरोनाची भीती वाढली! श्रीलंकेविरुद्ध मालिकेआधी BCCI च्या नव्या गाईडलाईन्स

दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने बांगलादेशचा तीन गडी राखून पराभव केला. त्यांनी सामन्याच्या चौथ्या दिवशी 7 गडी गमावून 145 धावांचे लक्ष्य गाठले. श्रेयस अय्यर आणि रविचंद्रन अश्विन यांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत टीम इंडियाला वजय मिळवून दिला. यासह भारताने बांगलादेशचा दोन सामन्यांच्या मालिकेत 2-0 असा व्हाईटवॉश केला.