Ind vs Afg 2nd T20 : कोहलीच्या पुनरागमनामुळे 'या' खेळाडूचा पत्ता कट, शुभमन गिलही बाहेर? जाणून घ्या Playing XI

India vs Afghanistan T20I Series News |
India Vs Afghanistan 2nd T20 playing xi News Marathi
India Vs Afghanistan 2nd T20 playing xi News Marathisakal

India Vs Afghanistan 2nd T20 playing xi News : भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात आज म्हणजेच रविवार 14 जानेवारी रोजी दुसरा टी-20 सामना होळकर क्रिकेट स्टेडियम इंदूर येथे खेळला जाणार आहे. मोहाली येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने 6 विकेट्सने विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यामुळे हा सामना जिंकून भारताची नजर मालिकेत अजेय आघाडीवर असेल.

इंदूर टी-20 मध्ये भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल निश्चित आहेत. कारण या सामन्यातून स्टार फलंदाज विराट कोहली पुनरागमन करत आहे. त्याचबरोबर शुभमन गिलवरही संघाबाहेरची टांगती तलवार आहे.

India Vs Afghanistan 2nd T20 playing xi News Marathi
Ranji Trophy : 6 चौकार अन् 4 षटकार....! अर्जुन तेंडुलकरचा कहर पण थोडक्यात हुकल शतक

भारताकडून विराट कोहलीने शेवटचा टी-20 सामना वर्ल्ड कप 2022 मध्ये खेळला होता. तब्बल 14 महिन्यांच्या कालावधीनंतर अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत त्याची निवड झाली. पण वैयक्तिक कारणांमुळे कोहली मालिकेतील पहिला सामना खेळू शकला नाही, परंतु तो आता संघात सामील झाला आहे, आणि खेळण्यासाठी पूर्णपणे उपलब्ध आहे. विराट कोहलीच्या पुनरागमनामुळे सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, तो कोणत्या खेळाडूची जागा घेणार?

India Vs Afghanistan 2nd T20 playing xi News Marathi
Ranji Trophy 2024 : 54 चेंडूतील तब्बल 53 चेंडू निर्धाव! रणजी ट्रॉफीत विदर्भच्या पोट्ट्याने केला मोठा धमाका

या प्रश्नाचे उत्तर विराट कोहली कोणत्या जागेवर फलंदाजी करणार यावर अवलंबून आहे. आगामी टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ व्यवस्थापन विराटचा सलामीवीर म्हणून विचार करत असेल, तर तो कर्णधार रोहित शर्मासह इंदूरमध्ये डावाची सुरुवात करताना दिसू शकतो.

अशा स्थितीत शुभमन गिलला बाहेर होणार हे निश्चित आहे. दुसरीकडे, कोहली जर त्याच्या नियमित क्रमांक-3 वर खेळला तर तिलक वर्मावर टांगती तलवार येऊ शकते. यशस्वी जैस्वाल यांच्या उपलब्धतेवरही प्रश्नचिन्ह आहे. यशस्वी दुखापतीमुळे मोहालीत खेळू शकला नाही, त्याची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत कोणतीही माहिती नाही.

मात्र आजच्या सामन्यासाठी तो उपलब्ध असला तरी शुभमन गिल संघाबाहेर असू शकतो. आणि आवेश खानला संधी देऊन भारत गोलंदाजीतही बदल करू शकतो. आवेश संघात कोणाची जागा घेतो हे पाहणे बाकी आहे.

भारत प्लेइंग इलेव्हन विरुद्ध अफगाणिस्तान : रोहित शर्मा, शुभमन गिल/यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, जितेश शर्मा, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com