Team India WC23 : रोहित अन् कोच राहुल टेन्शनमध्ये, अफगाणिस्तानविरुद्ध स्टार ओपनर होणार बाहेर?

Star opener against Afghanistan out, Rohit and coach Rahul in tension...
Team India WC23
Team India WC23Esakal

Team India WC23 : भारताचा सलामीवीर शुभमन गिल ऑस्ट्रेलियापाठोपाठ अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातून बाहेर जाऊ शकतो. एका मीडिया रिपोर्टमध्ये ही माहिती समोर आली आहे. शुभमन गिलला काही दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झाली होती. तो अद्याप पूर्णपणे बरा होऊ शकलेला नाही.

Team India WC23
Shahid Afridi : "मटण खायला सुरू केलं म्हणून..." भारतीय बॉलर्सच्या कामगिरीवरून आफ्रिदीचे वादग्रस्त विधान

एएनआयने एका सूत्राच्या हवाल्याने म्हटले आहे की, 'शुबमन गिल बरा होत आहे. तो टीम इंडियासोबत दिल्लीला जाणार आहे. तो संघासोबत असेल. तो चंदीगडला त्यांच्या घरी विश्रांतीसाठी जाणार नाहीत. आम्हाला आशा आहे की तो पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मैदानात खेळणाता दिसेल. पुढील वैद्यकीय अहवालावर त्याची अफगाणिस्तानविरुद्ध खेळण्याची शक्यता अवलंबून आहे.

Team India WC23
Ind vs Aus : असे फसले कांगारू...! सचिन पण म्हणतो ऑस्ट्रेलियाला 'ती' चूक पडली महागात

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून शुभमन गिललाही बाहेर ठेवले होते. त्याच्या जागी इशान किशनला संधी देण्यात आली होती. या सामन्यात इशान किशन पूर्णपणे फ्लॉप ठरला. तो खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला.

11 ऑक्टोबरला भारत आणि अफगाणिस्तान वर्ल्डकप 2023 मध्ये भिडणार आहेत. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. या मैदानावर झालेल्या मागील सामन्यात दक्षिण आफ्रिकेने धावांचा डोंगर उभारला होता. आफ्रिकेने 428 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये तीन फलंदाजांनीही शतके झळकावली होती. भारत-अफगाणिस्तान सामन्यातही असाच धावांचा पाऊस पडू शकतो.

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी शुभमन गिल तंदुरुस्त नसेल तर संघाला त्याची उणीव नक्कीच भासेल. शुभमन सध्या आयसीसी वनडे क्रमवारीत नंबर-2 फलंदाज आहे. या वर्षात आतापर्यंत त्याने वनडेत सर्वाधिक धावा केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com