IND vs AUS : टीम इंडियातून 5 खेळाडू बाहेर! कुलदीप यादवला मिळाली संधी अन्... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs AUS 1st odi 5 players out of Team India Kuldeep Yadav got a chance against Australia cricket news in marathi kgm00

IND vs AUS : टीम इंडियातून 5 खेळाडू बाहेर! कुलदीप यादवला मिळाली संधी अन्...

IND vs AUS 2023 : कसोटी मालिकेतील विजयानंतर आता वन डे क्रिकेटचा थरार सुरू झाला आहे. मुंबईत खेळल्या जात असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे ऑस्ट्रेलियन संघ प्रथम फलंदाजी करेल. भारताच्या प्लेइंग इलेव्हन मध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहे. कर्णधार हार्दिक पांड्याने पाच दिग्गज खेळाडूंना संघातून बाहेर केले आहे

भारताच्या प्लेइंग इलेव्हन बद्दल बोलताना, रवींद्र जडेजा संघात परतला आहे, ज्याने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली. कुलदीप यादवलाही संधी मिळाली आहे. तर भारतीय संघाने वॉशिंग्टन सुंदर, उमरान मलिक, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट युझवेंद्र चहल यांना संधी दिलेली नाही.

त्याचवेळी ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला आहे. अॅलेक्स कॅरी आजारी आहे, म्हणूनच तो परतला आहे. त्याच्या जागी आज जोश इंग्लिश खेळणार आहे. डेव्हिड वॉर्नरही पूर्णपणे तंदुरुस्त नाही. अशा स्थितीत मिचेल मार्श सलामीला येईल.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात हार्दिक पांड्या भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. रोहित शर्मा वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या वनडेत संघाचा भाग नाही. तो दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातून संघात सामील होईल. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघाची कमानही स्टीव्ह स्मिथच्या हाती आहे. ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाला परतला होता, त्याच्या आईचे नुकतेच निधन झाले आहे.

भारताची प्लेइंग इलेव्हन - शुभमन गिल, इशान किशन, विराट कोहली, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.