
IND vs AUS Playing 11: गिलसह ईशान किशन करणार ओपनिंग! कॅप्टन हार्दिक केएल राहुलला देणार डच्चू?
India vs Australia 1st ODI Playing 11 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका संपताच आता वनडे मालिका खेळल्या जाणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पहिला सामना उद्या खेळल्या जाणार आहे.
श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह या सामन्यात खेळणार नाहीत, कारण हे दोन्ही खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. तर रोहित शर्माही पहिल्या वनडेत खेळणार नाही. अशा परिस्थितीत हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करेल. मग पहिल्या वनडेत भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असेल पाहू.
कौटुंबिक कार्यक्रमामुळे रोहित शर्मा पहिल्या वनडेत खेळणार नाही. त्याच्या जागी हार्दिक संघाची धुरा सांभाळणार आहे.
इशान किशनला संधी मिळण्याची खात्री, श्रेयसच्या दुखापतीनंतर सूर्यकुमार यादवलाही संधी मिळू शकते.
रोहित शर्मा खेळणार नाही म्हणजे गिलसह ईशान किशन करणार ओपनिंग करतील.
गिलसह ईशान किशन ओपनिंग करणार मग कॅप्टन हार्दिक केएल राहुलला डच्चू देणार का?
या वर्षाच्या अखेरीस 2023 च्या विश्वचषकाची तयारी करत असताना टीम इंडिया 17 मार्च रोजी पहिला एकदिवसीय सामना खेळून 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये परतेल.
अशा स्थितीत या मालिकेत भारत ऑस्ट्रेलियाशी कसोटी मालिकेप्रमाणे टक्कर देण्यासाठी सज्ज असेल.
पहिल्या वनडेत रोहित शर्माच्या अनुपस्थितीत सर्वांच्या नजरा हार्दिककडे असणार आहे. हार्दिक हा आतापर्यंतचा सर्वोत्तम कर्णधार असल्याचे सिद्ध झाले आहे कारण त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आतापर्यंत एकही टी-20 मालिका गमावलेली नाही.
रोहितच्या अनुपस्थितीत, इशान किशनला संधी मिळण्याची खात्री आहे, जो शुभमन गिलसोबत सलामीसाठी मैदानात उतरू शकतो. किशनने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये द्विशतक झळकावून सिद्ध केले होते.
विराट कोहलीने या वर्षाच्या सुरुवातीला वनडे शतकाचा दुष्काळ संपवला आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम कसोटीत तो अव्वल फॉर्ममध्ये दिसला.