IND vs AUS: ऑस्ट्रेलियाने रचला इतिहास! 234 चेंडू राखून ODI क्रिकेटमध्ये भारताचा केला सर्वात मोठा पराभव

ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय; दुसरा सामना 37 षटकांत संपला
India vs Australia: Rohit Sharma And Co Register Unwanted Record With Heavy Loss In 2nd ODI
India vs Australia: Rohit Sharma And Co Register Unwanted Record With Heavy Loss In 2nd ODI

India vs Australia 2nd ODI : विशाखापट्टणममध्ये पावसाचा अंदाज होता पण वादळ आले, तेही ऑस्ट्रेलियन खेळाडूचं. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मिचेल स्टार्कच्या घातक गोलंदाजीमुळे पहिल्या वनडेत भारताचा डाव 117 धावांवर गडगडला. यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श यांनी भारतीय गोलंदाजांना धु धु धुतलं. ऑस्ट्रेलियाने 10 विकेट्सने विजय मिळवत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

India vs Australia: Rohit Sharma And Co Register Unwanted Record With Heavy Loss In 2nd ODI
IND vs AUS 2nd ODI : गोलंदाजांनी रोखलं, फलंदाजांनी ठोकलं! ऑस्ट्रेलियाचा भारतावर १० विकेट्सने विजय

ऑस्ट्रेलियाने हा सामना 10 विकेटने जिंकून इतिहास रचला. ज्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांना खेळता आले नाही, तेथे ऑस्ट्रेलियन सलामी जोडीने मोठे फटके मारले. मिचेल मार्शने 66 धावांच्या खेळीत 6 षटकार लगावले. ट्रॅव्हिस हेडने 51 धावांच्या खेळीत चौकारावरून 40 धावा केल्या.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला, ही पहिली वेळ नसली तरी यावेळी भारताचा पराभव हा सर्वात मोठा आणि लाजिरवाणा आहे. ऑस्ट्रेलियाने 11 षटके खेळून लक्ष्य गाठले, तेही एकही विकेट न गमावता. उर्वरित चेंडूंवर आधारित हा सर्वात मोठा विजय आहे, जेव्हा ऑस्ट्रेलियाने 234 चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला.

India vs Australia: Rohit Sharma And Co Register Unwanted Record With Heavy Loss In 2nd ODI
IND vs AUS 2nd ODI: आऊट, आऊट अन् आऊट… स्टार्कसमोर दिग्गज भारतीय खेळाडूंनी टेकले गुडघे

2019 मध्ये भारताचा 8 गडी राखून पराभव केला होता, त्या सामन्यात न्यूझीलंडचे 212 चेंडू शिल्लक होते. ऑस्ट्रेलियाने भारतावर दुसऱ्यांदा 10 गडी राखून विजय मिळवला आणि अशी कामगिरी करणारा पहिला संघ ठरला आहे.

मिचेल स्टार्कने पहिल्याच षटकातच तिसऱ्या चेंडूवर शुभमन गिलला बाद करत भारताला धक्का दिला. गिलने खराब शॉट खेळला आणि पॉईंटच्या दिशेने झेलबाद झाला. पहिल्या सामन्यात जे घडले होते, त्याच पद्धतीने तो आऊट झाला.

India vs Australia: Rohit Sharma And Co Register Unwanted Record With Heavy Loss In 2nd ODI
IND vs AUS : स्टार्कचा पंजा! ओपनिंग जोडीनं 'स्टार्टर'मध्येच संपवली मॅच

यानंतर त्यांनी रोहित, सूर्यकुमार यादव यांनाही आपला शिकार बनवले. सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा गोल्डन डक ठरला, तो सलग दुसऱ्यांदा पहिल्याच चेंडूवर बाद झाला. हार्दिक पांड्याही 1 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला, त्याचा अप्रतिम झेल स्टीव्ह स्मिथने घेतला.

अक्षर पटेलने 29 धावांची नाबाद खेळी खेळून भारताला 100 च्या पुढे नेले. भारत 117 धावांवर ऑल आऊट झाला, जो घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा नीचांक होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com