
IND vs AUS : दुसऱ्या वनडे सामन्यावर संकटाचे ढग? विशाखापट्टणममध्ये मुसळधार पाऊस
India vs Australia 2nd ODI Visakhapatnam : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वनडे मालिकेतील पहिला सामना भारताने मुंबईत पाच गडी राखून जिंकला. दुसरा सामना आज विशाखापट्टणम येथे खेळल्या जाणार आहे. पहिला सामना जिंकून भारत मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे.
विशाखापट्टणम वनडे जिंकून मालिका काबीज करण्याकडे भारताचे लक्ष असेल. या सामन्यासाठी टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा टीम इंडियात परतणार आहे.
मात्र आता विशाखापट्टणम सामन्यावर पावसाचा धोका निर्माण झाला आहे. शहरात एक दिवसापूर्वी मुसळधार पाऊस झाला. यासोबतच स्टेडियममधून काही फोटो समोर आले आहेत, ज्यात पावसापासून बचाव करण्यासाठी मैदान आणि खेळपट्टीवर कव्हर लावण्यात आले आहेत.
विशाखापट्टणममध्ये सामन्याच्या दिवशी म्हणजेच रविवारी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या दिवशी सकाळी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. अशा स्थितीत ओल्या मैदानामुळे नाणेफेक होण्यास विलंब होऊ शकतो. दिवसभर ढगाळ वातावरण राहील.
Accuweather नुसार, रविवारी विशाखापट्टणममध्ये पावसाची 80 टक्के शक्यता आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहील. सायंकाळी 4 ते 6 दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाच वाजेच्या सुमारास जवळपास 51 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक , शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल आणि जयदेव उनाडकट.