मुंबईकर खेळाडूच वाढवणार रोहितची डोकेदुखी; सूर्याला दाखवावा लागणार बेंच? : IND vs AUS 2nd Test India Playing 11 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs AUS 2nd Test India Playing 11

IND vs AUS India Playing 11 : मुंबईकर खेळाडूच वाढवणार रोहितची डोकेदुखी; सूर्याला दाखवावा लागणार बेंच?

IND vs AUS 2nd Test India Playing 11 : भारताने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 1 डाव आणि 132 धावांनी विजय मिळवत 4 सामन्यांच्या मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरी कसोटी दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर 17 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. मात्र दुसऱ्या कसोटीत रोहित शर्मा आणि निवडसमितीसाठी संघ निवड हा कळीचा मुद्दा ठरणार आहे.

पहिल्या कसोटीत भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर हा दुखापतीमुळे खेळला नव्हता. आता तंदुरूस्त झालेला अय्यर दुसऱ्या कसोटीसाठी संघात परतला आहे. मात्र त्याच्या परतण्याने रोहित शर्माच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. आता अय्यर संघात आल्याने सूर्यकुमार यादवला बेचंवर बसावे लागण्याची शक्यात आहे. दुसरीकडे शुभमन गिल देखील प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळवण्यासाठी जोर लावत आहे. तो केएल राहुल आणि श्रेयस अय्यर या दोघांच्या जागी खेळू शकतो.

रोहित शर्मासमोर आहेत हे 3 प्रश्न

- शुभमन गिल, केएल राहुल किंवा सूर्यकुमार यादव?

- केएस भरत की इशांत शर्मा?

- कुलदीप यादवच्या रूपात चौथा फिरकीपटू खेळवणे?

दरम्यान, श्रेयस अय्यरने राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीतील रिहॅब यशस्वीरित्या पूर्ण केले. तो पाठीच्या दुखपतीने त्रस्त होता. आता बीसीसीआयच्या मेडिकल टीमने त्याला फिट घोषित केले आहे. भारतीय संघ दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी आपल्या संघाचे विजयी कॉम्बिनेशन न बदलता कायम ठेवण्याची शक्यता आहे.

अरूण जेटली स्टेडियमवरील खेळपट्टी देखील फिरकीला पोषक आहे. त्यामुळे अक्षर पटेल, रविंद्र जडेजा आणि अश्विन हे कॉम्बिनेशन कायम राहण्याची शक्यता आहे. याचा अर्थ कुलदीप यादवला अजून काही काळ बेंचवर बसावे लागले.

दुसरीकडे संघ व्यवस्थापनाला शुभमन गिल, सूर्यकुमार यादव आणि केएल राहुल यांच्याबद्दल देखील निर्णय घ्यावा लागेल. पहिल्या कसोटीत शुभमन गिल बेंचवर होता तर राहुल आणि सूर्यकुमारला संधी मिळाली होती.

सूर्यकुमार यादवला आपल्या पहिल्या कसोटीत फारशी चमक दाखवता आली नाही. केएल राहुलची स्थिती देखील तशीच आहे. मात्र बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने केएल राहुल दुसऱ्या कसोटीत खेळेल असे संकेत दिले होते.

(Sports Latest News)

हेही वाचा : नेट बँकिंग सुविधा वापरताय? मग हे नक्कीच वाचा...