IND vs AUS: दिल्ली कसोटीत संघाला मोठा धक्का! चालू सामन्यातून दिग्गज खेळाडू बाहेर

IND vs AUS 2nd Test Match david warner
IND vs AUS 2nd Test Match david warner

IND vs AUS 2nd Test Match : बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात खराब झाली. भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियन संघ दिल्ली कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 263 धावांत गारद झाला. दरम्यान या सामन्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आली आहे. एका धडाकेबाज खेळाडूला गंभीर दुखापत झाली आहे, हा खेळाडू दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर पडू शकतो.

IND vs AUS 2nd Test Match david warner
IPL 2023 Schedule : मुंबई - चेन्नई कधी भिडणार? संघाचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा एक चेंडू डेव्हिड वॉर्नरच्या हाताच्या कोपरावर लागला. डेव्हिड वॉर्नरच्या दुखापतीमुळे फिजिओला मैदानावर आले. तो खूप वेदनांनी दिसला. डेव्हिड वॉर्नरची ही दुखापत गंभीर असल्याचे बोलले जात आहे.

या घातक गोलंदाजीसमोर वॉर्नरला एक धाव काढण्यासाठी झगडावे लागत होते. भारतीय फलंदाजी दरम्यान त्यानी क्षेत्ररक्षण देखील केले नाही. अशा परिस्थितीत त्याच्या दुखापतीबद्दल मोठे अपडेट देत, उस्मान ख्वाजाने पुष्टी केली की वॉर्नर 100% नाही.

IND vs AUS 2nd Test Match david warner
IND vs AUS 2nd Test : पहिला दिवस संपला! भारताची सलामी जोडी सलामत, ऑस्ट्रेलिया 263 धावात गारद

पत्रकार परिषदेत डेव्हिड वॉर्नरवर उस्मान ख्वाजा म्हणाला की, त्याच्या हाताला आणि डोक्याला दुखापत झाली आहे, मला वाटतं त्याच्या डोक्यात सध्या थोडा प्रॉब्लेम आहे आणि तो मैदानावर येऊ शकला नाही. येथून काय होते ते वैद्यकीय पाहत आहे. फॉक्स स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, जर वॉर्नर सामन्यातून बाहेर पडला तर मॅट रेनशॉ खेळल. रेनशॉने नागपुरात पहिली कसोटी खेळली, ज्यात त्याने पहिल्या डावात 2 धावा आणि दुसऱ्या डावात 0 धावा केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com