IND vs AUS: पॅट कमिन्सने दिले संकेत; डेव्हिड वॉर्नरला मिळणार डच्चू? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ind vs aus 2nd test Pat Cummins drops

IND vs AUS: पॅट कमिन्सने दिले संकेत; डेव्हिड वॉर्नरला मिळणार डच्चू?

Ind vs Aus 2nd Test Pat Cummins : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023 ची सुरुवात ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघासाठी फारशी चांगली झाली नाही. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियन संघाने तीन दिवसांत एक डाव आणि 132 धावांनी गमावला होता. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने दुसऱ्या कसोटीपूर्वी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याचे संकेत दिले आहेत.

मालिकेतील दुसरा कसोटी सामना 17 फेब्रुवारीपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या जाणार आहे. या कसोटी सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत पॅट कमिन्स म्हणाला, 'ट्रॅव्हिस हेडने आमच्यासाठी चांगली कामगिरी केली आहे. तो आता पण उत्कृष्ट कामगिरी करत आहे. या कसोटी सामन्यासाठी त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्याबाबत आमच्या चर्चेचा होत आहेत. यामुळे डेव्हिड वॉर्नरला डच्चू मिळू शकतो.

डेव्हिड वॉर्नर इंडियन प्रीमियर लीग मधील दिल्ली कॅपिटल्सचा भाग आहे. वॉर्नरची फॅन फॉलोइंग भारतातही खूप जास्त आहे. पॅट कमिन्स वॉर्नरबद्दल म्हणाले, जेव्हा तो विरोधी संघावर वर्चस्व गाजवतो तेव्हा तो खूप धोकादायक असल्याचे सिद्ध होते. खेळपट्टीबाबत कमिन्स म्हणाला, 'खेळपट्टीबाबत सध्या काही सांगू शकत नाही. ती वेगळी माती आहे, पण टर्नरची विकेट असेल हे आम्हाला माहीत आहे.