IND vs AUS: ऑस्ट्रेलियाची रडारडी सुरूच! आधी खेळपट्टी आता स्टेडियमला नाक मुरडलं

ऑस्ट्रेलिया मीडियाचे भारतावर नव्याने आरोप
IND vs AUS 3rd Test Indore
IND vs AUS 3rd Test Indoresakal

IND vs AUS Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिला सामना भारताने एक डाव आणि 132 धावांनी जिंकला. या मोठ्या पराभवानंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघापेक्षा आता ऑस्ट्रेलियन मीडिया घाबरला आहे. सुरुवातीच्या सामन्यात खेळपट्टीवर गोंधळ निर्माण करणाऱ्या ऑस्ट्रेलियन मीडियाने तिसरी कसोटी धरमशाला ते इंदूर (IND vs AUS 3rd Test Indore) हलवण्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे.

IND vs AUS 3rd Test Indore
WPL Auction 2023 : आरसीबीची धडाधड शॉपिंग! स्ट्राईक रेट असा की सूर्यालाही लाजवेल

धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमचे आउटफिल्ड पूर्णपणे योग्य नसल्यामुळे बीसीसीआयने तिसरा कसोटी सामना धर्मशाला येथून हलवला आहे. मैदानात ड्रेनेज सिस्टीम बसवण्यात आली असून, त्यामुळे अद्याप गवत वाढू शकलेले नाही. या कारणास्तव बीसीसीआयने स्थळ बदलले आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियातील मीडियाने भारतावर नव्याने आरोप करण्याचा खेळ सुरू केला आहे.

IND vs AUS 3rd Test Indore
Eoin Morgan: विश्वचषक विजेता कर्णधार इयॉन मोर्गनने क्रिकेटला केला अलविदा!

ऑस्ट्रेलियातील मीडिया संस्था फॉक्सने सांगितले की, आर अश्विनचा ट्रॅक रेकॉर्ड लक्षात घेऊन इंदूरची निवड करण्यात आली आहे. फॉक्स क्रिकेटने ट्विट केले, भारताची तिसरी कसोटी नवीन ठिकाणी हलवण्यात आली आहे... जिथे रविचंद्रन अश्विनची चेंडूसह सरासरी 12.50 आहे.

नागपुरातील सुरुवातीच्या कसोटीदरम्यान, फॉक्स क्रिकेटने एका छोट्या व्हिडिओ क्लिपच्या आधारे रवींद्र जडेजा आपल्या गोलंदाजीच्या बोटाला काय तरी लावत असल्याचा आरोप केला होता. नंतर असे आढळून आले की, जडेजाच्या दुखऱ्या बोटासाठी मलम लावत होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com