तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघाच्या नेतृत्वात मोठा बदल, कमिन्सऐवजी... | IND vs AUS 3rd Test Pat Cummins | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pat Cummins IND vs AUS 3rd Test

IND vs AUS 3rd Test Pat Cummins : तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघाच्या नेतृत्वात मोठा बदल, कमिन्सऐवजी...

Pat Cummins IND vs AUS 3rd Test : ऑस्ट्रेलियाने बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेतील तिसऱ्या कसोटीसाठी आपल्या नेतृत्वात मोठा बदल केला आहे. ऑस्ट्रेलियाचा पूर्णवेळ कसोटी कर्णधार पॅट कमिन्स तिसऱ्या कसोटीला मुकणार असून त्याच्या ऐवजी उपकर्णधार स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणार आहे. तिसरा कसोटी सामना हा इंदौर येथे 1 मार्चपासून सुरू होत आहे.

पॅट कमिन्सची आई अजारी असल्याने दुसऱ्या कसोटीनंतर कमिन्स ऑस्ट्रेलियाला परतला आहे. तो आता तिसऱ्या कसोटीला मुकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कमिन्स आपल्या वक्तव्यात म्हणतो, 'माझी आई आजारी असल्याने मी भारतातून परतण्याचा निर्णय़ घेतला. मला वाटले की माझी माझ्या कुटुंबाला गरज आहे. मला क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि संघ सहकाऱ्यांनी या प्रसंगी मला पाठिंबा दिला. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.'

स्टीव्ह स्मिथला ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचे उपकर्णधारपद 2021 मध्ये देण्यात आले होते. तेव्हापासून तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाचा हा माजी कर्णधार पुन्हा संघाच्या नेतृत्वाची धुरा आपल्या खांद्यावर वाहत आहे. अॅडलेड येथील दोन्ही कसोटीत कमिन्सच्या अनुपस्थितीत स्मिथने कर्णधारपद भूषवले होते.

स्मिथने 2014 ते 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाचे 34 कसोटीत नेतृत्व केले होते. त्यानंतर त्याच्यावर सँडपेपर प्रकरणात कारवाई जलाही होती. त्यावेळी त्याला संघातील स्थान आणि कर्णधारपद दोन्ही गमवावे लागले होते. स्मिथने भारताविरूद्ध ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व 2017 मध्ये केले होते. या मालिकेत त्याने तीन शतके ठोकली होती.

(Sports Latest News)

हेही वाचा : जाणून घ्या कॉन्ट्रा फंडातल्या गुंतवणुकीबाबत