IND vs AUS : पहिल्याच षटकात कांगारूं संघाचा गोंधळ! रोहितला मिळाले दोन जीवनदान पण...

IND vs AUS : पहिल्याच षटकात कांगारूं संघाचा गोंधळ! रोहितला मिळाले दोन जीवनदान पण...

India vs Australia 3rd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळल्या जात आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

IND vs AUS : पहिल्याच षटकात कांगारूं संघाचा गोंधळ! रोहितला मिळाले दोन जीवनदान पण...
IND vs AUS 3rd Test : इंदूर कसोटीतुन केएल राहुल बाहेर! संघात दोन बदल, या दिग्गज खेळाडूची एंट्री

भारताकडून सलामीला कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल मैदानात उतरले आहेत. मिचेल स्टार्कच्या पहिल्याच षटकात रोहित शर्माला दोन जीवदान मिळाले. ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर रोहित शर्माला जीवदान मिळाले. चेंडू रोहितच्या बॅटला लागला आणि विकेटकीपर कॅरीच्या हातात गेला. संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघाने अपील केले, परंतु मैदानावरील पंचांनी ते नाकारले. यानंतर नंतर टीव्ही स्क्रीनवरील रिप्लेमध्ये असे दिसून आले की चेंडू त्याच्या बॅटला लागला होता.

IND vs AUS : पहिल्याच षटकात कांगारूं संघाचा गोंधळ! रोहितला मिळाले दोन जीवनदान पण...
IND vs AUS 3rd Test : इंदूर कसोटीतुन केएल राहुल बाहेर! संघात दोन बदल, या दिग्गज खेळाडूची एंट्री

यानंतर चौथ्या चेंडूवर चेंडू रोहितच्या बॅटिंग पॅडला लागला. स्टार्कने अपील केले, पण बाकीच्या खेळाडूंनी त्याला साथ दिली नाही. कर्णधार स्मिथ पुन्हा डीआरएससाठी गेला नाही. नंतरच्या रिप्लेमध्ये रोहित एलबीडब्ल्यू आऊट झाल्याचे दिसून आले. स्मिथने डीआरएस वापरला असता, तर रोहित दोन्ही वेळी बाद झाला असता. मात्र, कर्णधार रोहितला मिळालेल्या दोन जीवांचे जास्त काही करता आले नाही. त्याला मॅथ्यू कुहनेमनने यष्टिरक्षक अॅलेक्स कॅरीच्या हाती यष्टिचित केले. रोहितला 23 चेंडूत 12 धावा करता आल्या.

टीम इंडियाने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत आधीच 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. ही कसोटी जिंकून भारतीय संघाला मालिका जिंकायची आहे. तसेच, हा सामना जिंकल्यानंतर टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com