IND vs AUS 4th Test : इंदूर कसोटी हरल्यानंतर रोहित सेनेने अहमदाबादमधील प्लॅनच बदलला

IND vs AUS 4th Test Rohit Sharma
IND vs AUS 4th Test Rohit Sharma esakal

IND vs AUS 4th Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना पाहुण्या ऑस्ट्रेलियाने 9 विकेट्सनी जिंकला. भारत जरी या मालिकेत 2 - 1 ने आघाडीवर असला तरी या पराभवाने भारतासाठी अनेक इक्वेशन बदलली आहेत. विशेषकरून भारतीय संघाचा अहमदाबादमधील प्लॅनवर याचा मोठा परिणाम झााला आहे. रोहित सेनेने इंदूर कसोटीतील पराभव इतका मनावर घेतला आहे की त्यांनी आपला संपूर्ण प्लॅनच बदलला आहे.

भारतीय संघाने जर इंदूर कसोटी जिंकली असती तर अहदमाबादमधील चौथ्या कसोटीत भारतीय संघ WTC Final च्या सरावावर भर देणार होती. अहदमाबादची खेळपट्टी जरी फिरकीसाठी ओळखली जात असली तरी ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ व्यवस्थापन ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना साथ देणारी करणार होते.

याचा उद्येश हा WTC Final पूर्वी इंग्लंडमधील खेळपट्टीचा आभास निर्माण करणारी खेळपट्टी तयार करून सराव करण्याचा होता.

IND vs AUS 4th Test Rohit Sharma
WPL 2023 GG vs MI LIVE : गुजरात - मुंबई भिडणार! कियारा - कृती माहोल सेट करणार

मात्र आता भारताला मालिका जिंकून WTC फायनलमधील आपले स्थान पक्के करण्यासाठी चौथी कसोटी जिंकणे गरजेचे झाले आहे. यामुळेच भारतीय संघाने आपला प्लॅन बदलला असून आता अहमदाबाद कसोटीसाठी आता पारंपरिक फिरकीला साथ देणारीच खेळपट्टी तयार केली जाणार आहे.

याबाबत एका सूत्राने माहिती दिली की, 'आम्हाला अजून भारतीय संघाकडून कोणतीही सुचना मिळालेली नाही. आमचे स्थानिक क्युरेटर खेळपट्टी तयार करत आहेत. आम्ही प्रत्येक हंगामात जशी खेळपट्टी करतो तशीच खेळपट्टी तयार करत आहोत.'

बसीसीआय किंवा संघ व्यवस्थापनाकडून जरी काही सूचना नसल्या तरी गुजरात क्रिकेट असोसिएशनचे क्युरेटर फलंदाजीला पोषक अशी खेळपट्टी तयार करत होते. नुकताच या मैदानावर रणजी ट्रॉफीचा सामना झाला होता. त्यावेळी रेल्वेने गुजरातविरूद्ध 508 झााव केल्या होत्या. याचबरोबर दुसऱ्या डावात देखील 200 पेक्षा जास्त धावा झाल्या होत्या. अशीच खेळपट्टी असण्याची शक्यता आहे.

IND vs AUS 4th Test Rohit Sharma
WPL 2023 GG vs MI : बीसीसीआयने ऐनवेळी मुंबई - गुजरात सामन्याचं टायमिंग बदललं

गुजरात क्रिकेट असोसिएशनमधील सूत्रांनी सांगितले की, 'गेला रणजी ट्रॉफी सामना जानेवारी महिन्यात झाला होता. त्यावेळी प्रथम फलंदाजी करणाऱ्या रेल्वेजने 500 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. जरी गुजरातचा एका डावाने पराभव झाला असला तरी त्यांनी दोन्ही डावात 200 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. यावेळी देखील अशीच खेळपट्टी असेल.'

कशी असते अहमदाबादची खेळपट्टी

  • माती : काळी माती जी फिरकीला साथ देते.

  • पहिल्या डावातील सरासरी धावा : 338

  • दुसऱ्या डावातील सरासरी धावा : 337

  • चौथ्या डावातील सरासरी धावा : 147

  • शेवटचा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना : भारत विरूद्ध इंग्लंड, भारताने सामना एक डाव आणि 25 धावांनी जिंकला.

(Sports Latest News)

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com