
IND vs AUS : मोहम्मद सिराजचा पत्ता कट! टीम इंडियाने प्लेइंग-11 मध्ये केला मोठा बदल
Ind Vs Aus 4th Test Day 1 Mohammed Siraj : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या चौथ्या आणि शेवटचा सामना खेळल्या जात आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ मालिकेत 2-1 ने आघाडीवर असून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी त्यांना हा सामना जिंकावा लागेल.
शेवटचा सामना जिंकणाऱ्या कांगारू संघाने कोणताही बदल केला नाही. त्याचबरोबर भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला विश्रांती देण्यात आली असून मोहम्मद शमीचे टीम इंडियात पुनरागमन करत आहे.
संघ खालीलप्रमाणे आहेत
भारत : रोहित शर्मा (क), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, श्रीकर भरत, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, उमेश यादव
ऑस्ट्रेलिया : ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, पीटर हँड्सकॉम्ब, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, टॉड मर्फी, मॅथ्यू कुहनमन