IND vs AUS Day 3 : कोहलीचे दमदार अर्धशतक, दिवस अखेर भारताची 289 धावांपर्यंत मजल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ind vs aus 4th-test Day 3 live-cricket-score in marathi

IND vs AUS Day 3 : कोहलीचे दमदार अर्धशतक, दिवस अखेर भारताची 289 धावांपर्यंत मजल

India vs Australia 4th Test Day 3 Cricket Score : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या आणि शेवटच्या कसोटीचा तिसारा दिवस संपला. तिसऱ्या दिवसअखेर भारताने आपल्या पहिल्या डावात 3 बाद 289 धावांपर्यंत मजल मारली. भारत अजून पहिल्या डावात 191 धावांनी पिछाडीवर आहे. तिसऱ्या दिवसाचा हिरो ठरला तो 23 वर्षाचा शुभमन गिल! त्याने 235 चेंडूत 128 धावांची दमदार शतकी खेळी केली. ही त्याची कारकिर्दीतील दुसरी शतकी खेळी आहे. याचबोबर चेतेश्वर पुजाराने 42 तर विराट कोहलीने अर्धशतकी ( 59 ) खेळी करत भारताला तिसऱ्या दिवशी 300 च्या जवळ पोहचवले.

268-3 (92.5 Ov) : विराट कोहलीचे दमदार अर्धशतक

शुभन गिल बाद झाल्यानंतर भारतीय डावाची सूत्रे विराट कोहलीने आपल्या हातात घेतली त्याने रविंद्र जडेजाच्या साथीने भागीदारी रचत संघाला 250 च्या पार पोहचवले. तसेच आपले अर्धशतक देखील पूर्ण केले.

245-3 : अखेर नॅथन लायनला मिळाले यश 

ऑस्ट्रेलियाचा अव्वल फिरकीपटू नॅथन लायनने जवळपास 28 षटके गोलंदाजी केली होती. मात्र त्याला एकही यश मिळाले नव्हते अखेर त्याने शुभमन गिलची शिकार करत भारताला मोठा धक्का दिला. गिल 235 चेंडूत 128 धावा करून बाद झाला.

चहापानानंतर खेळ सुरू 

चहापानानंतर खेळ सुरू झाला आहे. आजचा तिसऱ्या सत्राचा खेळ सुरूच आहे. भारताने दोन गडी गमावून 196 धावा केल्या आहेत. सध्या शुभमन गिल 109 धावा आणि विराट कोहली 2 धावा करत क्रीजवर आहे.

शुबमन गिलने ठोकले शतक! मात्र भारताला मोठा धक्का

ज्या षटकात शुभमनने शतक झळकावले, त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चेतेश्वर पुजारा बाद झाला. त्याला टॉड मर्फीने एलबीडब्ल्यू आऊट केले. पुजाराचे अर्धशतक हुकले आणि तो 121 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 42 धावा करून बाद झाला. पुजाराने शुभमनसोबत दुसऱ्या विकेटसाठी 248 चेंडूत 113 धावांची भागीदारी केली.

शुबमन गिलने अहमदाबाद कसोटीत ठोकले शतक! भारताचा कांगारूवर काउंटर अॅटॅक

शुभमन गिलने 194 चेंडूत दुसरे कसोटी शतक झळकावले. त्याने टॉड मर्फीला फाइन लेगवर फोर मारून शतक पूर्ण केले. एकंदरीत हे त्याचे सातवे आंतरराष्ट्रीय शतक ठरले आहे. शुभमनने वनडेमध्ये चार शतके आणि टी-20मध्ये एक शतक झळकावले आहे. शुभमनने बांगलादेशविरुद्ध कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. भारताची धावसंख्या सध्या एका विकेटवर 180 धावांच्या पुढे आहे.

भारतीय संघ 150 धावांच्या पुढे

480 धावांचा पाठलाग करताना भारताने पहिल्या डावात एका विकेटवर 150 हून अधिक धावा केल्या आहेत. सध्या शुभमन गिल 76 धावांवर तर चेतेश्वर पुजारा 34 धावांवर खेळत आहे. आतापर्यंत दोघांमध्ये 78 धावांची भागीदारी झाली आहे.

IND vs AUS Day 3 Live : गिल-पुजाराने सांभाळली टीम इंडियाचे धुरा!

जेवणानंतरचा खेळ सुरू झाला. भारताने एका विकेटवर 140 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियापेक्षा 330 धावांनी मागे आहे. शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांच्यात 60 हून अधिक धावांची भागीदारी झाली आहे. शुभमन 71 तर पुजारा 28 धावांवर खेळत आहे.

लंचपर्यंत शुभमन-पुजारा नाबाद

तिसऱ्या दिवशी लंचपर्यंत भारताने एक गडी गमावून 129 धावा केल्या आहेत. सध्या शुभमन गिल 119 चेंडूत 65 धावा करून नाबाद असून चेतेश्वर पुजारा 46 चेंडूत 22 धावा करून नाबाद आहे. दोघांमध्ये आतापर्यंत 55 धावांची भागीदारी झाली आहे. रोहित शर्मा 35 धावा करून बाद झाला. त्याला मॅथ्यू कुहनेमनने लबुशेनच्या हाती झेलबाद केले.

चौकार मारत शुभमन गिलने ठोकले अर्धशतक! भारताची शंभरी पार

मिचेल स्टार्कच्या चेंडूवर चौकार मारून शुभमन गिलने कसोटी कारकिर्दीतील पाचवे अर्धशतक पूर्ण केले. भारताने एक विकेट गमावून 100 धावा केल्या आहेत. पुजारा शुभमनसोबत खेळत आहे.

भारताला पहिला धक्का

भारताला पहिला धक्का 74 धावांवर बसला आहे. मॅथ्यू कुहनेमनने रोहितला आपल्या जाळ्यात अडकवले. रोहितला 58 चेंडूत 35 धावा करता आल्या. या खेळीत त्याने तीन चौकार आणि एक षटकार लगावला.

तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू

तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिल क्रीजवर आहेत.