IND vs AUS: ऑस्ट्रेलियाची रडारड आता ICCच्या दारी; नागपूरचा विषय लागला जिव्हारी

IND vs AUS Ian Healy calls for ICC action after Australia denied practice on Nagpur pitch after 1st Test defeat cricket news
IND vs AUS Ian Healy calls for ICC action after Australia denied practice on Nagpur pitch after 1st Test defeat cricket news

India vs Australia Nagpur Test Pitch : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात कांगारू संघाला एक डाव आणि 132 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. नागपुरात ऑस्ट्रेलियन संघाला पहिल्या डावात 177 धावा तर दुसऱ्या डावात 91 धावा करता आल्या. हा सामना तीन दिवसही चालला नाही. भारताच्या रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजासमोर कांगारू फलंदाज गुडघ्यावर दिसले.

नागपुरातील दारुण पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने फिरकी खेळपट्टीवर सराव करण्याचे नियोजन केले होते. रविवारी या खेळपट्टीवर खेळाडूंनी सराव आणि दिल्लीत होणाऱ्या दुसऱ्या सामन्याची तयारी करावी अशी कांगारू संघाची इच्छा होती.

IND vs AUS Ian Healy calls for ICC action after Australia denied practice on Nagpur pitch after 1st Test defeat cricket news
Mohammed Shami Match Fixing : शमीवरील मॅच फिक्सिंग आरोपांबाबत टीम इंडियातील सहकाऱ्याचा मोठा खुलासा

मात्र, तसे झाले नाही. नागपूरच्या पिच क्युरेटरने शनिवारीच खेळपट्टीवर पाणी ओतले आणि ऑस्ट्रेलियाचे सराव नियोजनही धोक्यात आले. तेव्हापासून कांगारू हैराण झाले आहेत. ऑस्ट्रेलियाचे पूर्ण लक्ष अजूनही नागुपर खेळपट्टीवर आहे. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू इयान हीली याने आयसीसीकडे या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

IND vs AUS Ian Healy calls for ICC action after Australia denied practice on Nagpur pitch after 1st Test defeat cricket news
IND vs AUS: टीम इंडियाला मोठा धक्का! हा दिग्गज खेळाडू दुसऱ्या कसोटीतून तर बुमराह ODI मधून बाहेर

हीली म्हणाली, नागपूरच्या त्या विकेटवर काही सराव सत्रे घेण्याची आमची योजना फसली ही खरोखरच लाजिरवाणी गोष्ट आहे. हे क्रिकेटसाठी चांगले नाही. आयसीसीने याकडे लक्ष्य दिले पाहिजे. हे आमच्या खेळाडूसाठी धक्कादायक होते. सरावासाठी विनंती केल्यावर विकेटला पाणी द्या आणि त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे. कसोटी मालिका सुरू झाल्यापासून नागपूरची खेळपट्टी चर्चेचा मुद्दा आहे. आता सामना संपल्यानंतरही त्यावर चर्चा होत आहे.

सामन्यापूर्वीच काही ऑस्ट्रेलियन पत्रकार आणि माजी क्रिकेटपटूंनी भारतीयांवर त्यांच्या गरजेनुसार खेळपट्टी बदलल्याचा आरोप केला होता. या सामन्यात भारताने पहिल्या डावात 400 धावा केल्या होत्या, तर ऑस्ट्रेलियाला दोन डावात एकूण 268 धावाच करता आल्या. नवी दिल्लीतील दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळपट्टी पुन्हा एकदा फिरकीपटूंना मदत करेल अशी अपेक्षा आहे. या दौऱ्यावर एकही सराव सामना न खेळलेला ऑस्ट्रेलियाचा संघ स्वत:चा सराव करत आहे, पण त्यांच्या योजना सध्यातरी फसल्या आहेत. भारतीय खेळपट्ट्या आणि खेळपट्टीच्या क्युरेटरला या पराभवासाठी जबाबदार धरले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com