IND vs AUS: कांगारू संघाच्या अडचणीत वाढ! पहिली कसोटी खेळण्याआधीच तिसरा धक्का

स्टार्क, हेझलवूडनंतर दिग्गज खेळाडू मुकणार!
india-vs-australia-nagpur-test
india-vs-australia-nagpur-testsakal

India vs Australia Test Series : भारताविरुद्ध पहिली कसोटी खेळण्याआधीच ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का बसला आहे. मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड या प्रमुख वेगवान गोलंदाजांनी दुखापतीमुळे पहिल्या कसोटीत माघार घेतल्यानंतर आता ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का बसला आहे. युवा अष्टपैलू खेळाडू कॅमेरुन ग्रीन हादेखील दुखापतीमुळे पहिल्या कसोटीला मुकण्याची शक्यता आहे. स्टीवन स्मिथ याने मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबतचे संकेत दिले आहेत.

india-vs-australia-nagpur-test
IND vs AUS: नागपूर पोलीस दलात खळबळ! विराटचा मोबाईल हरवला की कुणी चोरला?

स्मिथ याप्रसंगी म्हणाला, ग्रीन दुखापतीमधून पूर्णपणे फिट झालेला वाटत नाही. वेगवान गोलंदाजीचा सामना त्याने अद्याप नेटमध्ये केलेला नाही. अर्थात ग्रीन खेळेल की नाही, याचे उत्तर माझ्याकडे नाही. याबाबत संयम बाळगण्याची गरज आहे. पण सध्याच्या परिस्थितीवरून तो खेळेल, असे वाटत नाही, असे तो पुढे स्पष्ट करतो.

india-vs-australia-nagpur-test
IND vs AUS 1st Test : विराट शैली बदलणार! पहिल्याच कसोटीत कांगारूंना लोळवण्यासाठी द्रविडचा मास्टर प्लॅन

रेनशॉ की हँडस्कम्ब?

कॅमेरुन ग्रीनच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियन संघात सहाव्या क्रमांकावर फलंदाजाला खेळवावे लागणार आहे. ग्रीन हा अष्टपैलू खेळाडू होता. याचा फायदा त्यांना कांगारूंना होत होता; पण आता त्याच्याऐवजी मॅट रेनशॉ व पीटर हँडस्कम्ब यांच्यापैकी एकाला संघात स्थान द्यावे लागणार आहे. ऑस्ट्रेलियन संघात डावखुऱ्या फलंदाजांची संख्या अधिक आहे. त्यामुळे डावखुऱ्या रेनशॉऐवजी उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या हँडस्कम्ब यालाही संधी देण्यात येऊ शकतो.

चार प्रमुख गोलंदाजांसह खेळणार

कॅमेरुन ग्रीनच्या दुखापतीचा कांगारूंना दुहेरी फटका बसू शकतो. कारण एक फलंदाजच नव्हे, तर एक गोलंदाज म्हणूनही तो संघात असतो. त्याच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाला एक अव्वल दर्जाचा गोलंदाज कमी पडतो. नागपूर कसोटीत कांगारूंना चारच गोलंदाजांसह मैदानात उतरावे लागणार आहे. तीन वेगवान गोलंदाज व नॅथन लायन या फिरकी गोलंदाजांसह त्यांना खेळावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com